S M L

मीरा भाईंदर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कॅटलीन परेरा

28 ऑगस्टमीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅटलीन परेरा या निवडून आल्या आहेत. शिवसेना भाजप युतीच्या प्रभाकर म्हात्रे यांचा पराभव झाला. परेरा यांना 50 मतं मिळाली आहेत. बहुमतासाठी 47 मतांची आवश्यकता होती. तर उपमहापौरपदी मुजफ्फर हुसेन यांच्या आई नूरजहाँ हुसेन या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणुकीत एकत्र लढले नसले तरी आता ते एकत्र येत आघाडीचा धर्म पाळला. शिवसेना आणि भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. पण या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बहुजन विकास आघाडी, मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 10:33 AM IST

मीरा भाईंदर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कॅटलीन परेरा

28 ऑगस्ट

मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅटलीन परेरा या निवडून आल्या आहेत. शिवसेना भाजप युतीच्या प्रभाकर म्हात्रे यांचा पराभव झाला. परेरा यांना 50 मतं मिळाली आहेत. बहुमतासाठी 47 मतांची आवश्यकता होती. तर उपमहापौरपदी मुजफ्फर हुसेन यांच्या आई नूरजहाँ हुसेन या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणुकीत एकत्र लढले नसले तरी आता ते एकत्र येत आघाडीचा धर्म पाळला. शिवसेना आणि भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. पण या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बहुजन विकास आघाडी, मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close