S M L

रत्नागिरीत गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटला

29 ऑगस्टरत्नागिरीतल्या गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. सुमारे 50 ते 60 फूट उंचीचे पाण्याचे लोट वेगाने बाहेर पडत आहेत. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या 6 गावांना धोका निर्माण झाला आहे. अतिशय वेगाने हे पाणी गड नदी पात्रात मिसळतंय. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मात्र पाण्यामुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचे सांगितलं आहे. बोगद्याच्या दरवाजाला लिकेज होती. संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने दरवाजा तुटला. आणि प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2012 09:40 AM IST

रत्नागिरीत गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटला

29 ऑगस्ट

रत्नागिरीतल्या गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. सुमारे 50 ते 60 फूट उंचीचे पाण्याचे लोट वेगाने बाहेर पडत आहेत. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या 6 गावांना धोका निर्माण झाला आहे. अतिशय वेगाने हे पाणी गड नदी पात्रात मिसळतंय. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मात्र पाण्यामुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचे सांगितलं आहे. बोगद्याच्या दरवाजाला लिकेज होती. संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने दरवाजा तुटला. आणि प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close