S M L

अरुण गवळीला 31 ऑगस्टला शिक्षा सुनावणार

28 ऑगस्टकमलाकर जामसांडेकर खून प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीला शिक्षेचा निकाल 31 ऑगस्टला दिला जाणार आहे. 24 ऑगस्टला कोर्टाने अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलंय. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2 मार्च 2007 रोजी जामसांडेकर यांचा खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडला नव्हता. पण अरुण गवळी या खटल्यात दोषी असल्याचं सिध्द झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 01:13 PM IST

अरुण गवळीला 31 ऑगस्टला शिक्षा सुनावणार

28 ऑगस्ट

कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीला शिक्षेचा निकाल 31 ऑगस्टला दिला जाणार आहे. 24 ऑगस्टला कोर्टाने अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलंय. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2 मार्च 2007 रोजी जामसांडेकर यांचा खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडला नव्हता. पण अरुण गवळी या खटल्यात दोषी असल्याचं सिध्द झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close