S M L

लतादीदींच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर

28 ऑगस्टकोल्हापूर येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ विकण्यावरुन कोल्हापूरकरांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. जयप्रभा स्टुडिओ विकण्याचा घाट घातल्याचा आरोप करत कोल्हापूरवासियांनी सर्वपक्षीय मोर्चा काढला. काळे झेंडे, 'लतादीदी स्टुडिओ विकण्याची का इतकी घाई' अशी बॅनर्स घेऊन कोल्हापूरकर आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ रस्त्यावर उतरले. जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या मालकीचा आहे. गायक सुरेश वाडकर यांना मध्यस्थ करून हा स्टुडिओ विकला जातोय असा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनात पक्ष कार्यकर्त्यांबरोबर कलाकार, विद्यार्थी आणि चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी सहभागी होते. सुरेश वाडकर यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप करत आंदोलकांनी वाडकर यांच्या फोटोला काळं फासलं. आंदोलक एवढ्यावर थांबले नाही जर लतादीदींना पैश्यांची कमतरता असेल तर त्यांच्यासाठी भीक मागून पैसा गोळ्या करुन देऊ असं सांगत आंदोलकांनी भीक मागो आंदोलन केलं. 1944 ला भालजी पेंढारकर यांनी या स्टुडिओ खरेदी केला होता. या स्टुडिओत चित्रपट महर्षी व्ही.शांतारामस भालजी पेंढारकर यांनी विविध कलाकृती इथं घडवल्या होत्या. कालांतराने या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर कुटुंबीयांकडे आली. गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओ विकला जाणार असल्याची कुणकुण कोल्हापूरवासीयांना लागली. लतादीदींच्या या निर्णयाविरोधात आज अखेर उद्रेक झाला. हजारो कोल्हपूरकर रस्त्यावर उतरले. या सगळ्या प्रकरणावर गायक सुरेश वाडकर यांनी प्रतिक्रिया दिली. लता मंगेशकर यांचा स्टुडिओ विकण्याचा निर्णय योग्य आहे असं गायक सुरेश वाडकर यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 03:07 PM IST

लतादीदींच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर

28 ऑगस्ट

कोल्हापूर येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ विकण्यावरुन कोल्हापूरकरांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. जयप्रभा स्टुडिओ विकण्याचा घाट घातल्याचा आरोप करत कोल्हापूरवासियांनी सर्वपक्षीय मोर्चा काढला. काळे झेंडे, 'लतादीदी स्टुडिओ विकण्याची का इतकी घाई' अशी बॅनर्स घेऊन कोल्हापूरकर आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ रस्त्यावर उतरले.

जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या मालकीचा आहे. गायक सुरेश वाडकर यांना मध्यस्थ करून हा स्टुडिओ विकला जातोय असा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनात पक्ष कार्यकर्त्यांबरोबर कलाकार, विद्यार्थी आणि चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी सहभागी होते. सुरेश वाडकर यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप करत आंदोलकांनी वाडकर यांच्या फोटोला काळं फासलं. आंदोलक एवढ्यावर थांबले नाही जर लतादीदींना पैश्यांची कमतरता असेल तर त्यांच्यासाठी भीक मागून पैसा गोळ्या करुन देऊ असं सांगत आंदोलकांनी भीक मागो आंदोलन केलं.

1944 ला भालजी पेंढारकर यांनी या स्टुडिओ खरेदी केला होता. या स्टुडिओत चित्रपट महर्षी व्ही.शांतारामस भालजी पेंढारकर यांनी विविध कलाकृती इथं घडवल्या होत्या. कालांतराने या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर कुटुंबीयांकडे आली. गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओ विकला जाणार असल्याची कुणकुण कोल्हापूरवासीयांना लागली. लतादीदींच्या या निर्णयाविरोधात आज अखेर उद्रेक झाला. हजारो कोल्हपूरकर रस्त्यावर उतरले. या सगळ्या प्रकरणावर गायक सुरेश वाडकर यांनी प्रतिक्रिया दिली. लता मंगेशकर यांचा स्टुडिओ विकण्याचा निर्णय योग्य आहे असं गायक सुरेश वाडकर यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close