S M L

कसाबला फाशी जुंदलचं काय ?

29 ऑगस्टअजमल कसाबला शिक्षा झाली असली तरी मुंबईवर झालेल्या या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी अतिरेकी अबू जुंदल मुख्य सुत्रधार आहे. त्यांने याबद्दल कबुलीही दिली. पण आता पुढचा तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचा संशयित अतिरेकी आणि 26/11 मुंबई हल्ल्यातला संशयित सूत्रधार अबू जुंदल याचीही क्राईम ब्रांचने चौकशी केली आहे. त्यात काही ठोस पुरावे मिळाल्याचं क्राईम ब्रांचचे जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी सांगितलंय. त्याच्याविरोधातलं आरोपपत्र वर्षअखेर सादर केलं जाणार आहे. जुंदलच्या तपासातून मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता, हे स्पष्ट होईल असा विश्वास पोलिसांना वाटतोय. जुंदलने आपल्याला आणि आपल्या साथीदारांना हिंदी शिकवल्याची कबुली कसाबने दिलीय. तसेच 26/11च्या रात्री जुंदलच कराचीतल्या लष्कर-ए-तोएबाच्या हेडक्वार्टरमध्ये बसून अतिरेक्यांना सूचनाही देत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2012 04:42 PM IST

कसाबला फाशी जुंदलचं काय ?

29 ऑगस्ट

अजमल कसाबला शिक्षा झाली असली तरी मुंबईवर झालेल्या या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी अतिरेकी अबू जुंदल मुख्य सुत्रधार आहे. त्यांने याबद्दल कबुलीही दिली. पण आता पुढचा तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचा संशयित अतिरेकी आणि 26/11 मुंबई हल्ल्यातला संशयित सूत्रधार अबू जुंदल याचीही क्राईम ब्रांचने चौकशी केली आहे. त्यात काही ठोस पुरावे मिळाल्याचं क्राईम ब्रांचचे जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी सांगितलंय. त्याच्याविरोधातलं आरोपपत्र वर्षअखेर सादर केलं जाणार आहे. जुंदलच्या तपासातून मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता, हे स्पष्ट होईल असा विश्वास पोलिसांना वाटतोय. जुंदलने आपल्याला आणि आपल्या साथीदारांना हिंदी शिकवल्याची कबुली कसाबने दिलीय. तसेच 26/11च्या रात्री जुंदलच कराचीतल्या लष्कर-ए-तोएबाच्या हेडक्वार्टरमध्ये बसून अतिरेक्यांना सूचनाही देत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close