S M L

वायुदलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 8 ठार

30 ऑगस्टगुजरातमध्ये जामनगरजवळच्या सरमट गावात वायु दलाच्या दोन हेलिकॉप्टर एमआई-17 ची भीषण टक्कर झाली. या टक्करीत दोन्ही हेलिकॉप्टरमधल्या सर्व 8 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. हे आठही जण एअरफोर्सचे अधिकारी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पण हा अपघात हवाई दलाच्या जागेत झालाय, रहिवासी भागात ही हेलिकॉप्टर्स पडली नसल्याचे हवाई दलाच्या गुजरात विभागाचे मुख्य पीआरओ एम.जी.मेहता यांनी स्पष्ट केलंय. हेलिकॉप्टर चालवणारे ट्रेनिंगवर असल्याची माहिती मिळती. जामनगर एअरबेसपासून 15 किलोमिटर अंतरावर हवेत या दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. एमआई-17 हेलिकॉप्टर हे वायुदलातील मोठे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरची आसनक्षमता दहा लोकांची असून या दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये 4-4 लोक प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरमध्ये अधिकार्‍यांसोबत दोन्ही चालक हे ट्रेनी असल्याचं सांगण्यात येतं आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वायुदलाकडून थरारक प्रात्यक्षिक आपल्याला पाह्याला मिळेते. सदरील घटनेच्या वेळी असा प्रयत्न केला गेला. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांपासून जवळून जाण्याचा प्रयत्न केला पण दुदैर्वाने टक्कर झाली. या अपघातात कोणीही बचावण्याची शक्यता फार कमी आहे. या अपघात प्रकरणी चालकांनी कॉकपिटच्या नियमांचा भंग केला का याची चौकशी सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2012 10:13 AM IST

वायुदलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 8 ठार

30 ऑगस्ट

गुजरातमध्ये जामनगरजवळच्या सरमट गावात वायु दलाच्या दोन हेलिकॉप्टर एमआई-17 ची भीषण टक्कर झाली. या टक्करीत दोन्ही हेलिकॉप्टरमधल्या सर्व 8 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. हे आठही जण एअरफोर्सचे अधिकारी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पण हा अपघात हवाई दलाच्या जागेत झालाय, रहिवासी भागात ही हेलिकॉप्टर्स पडली नसल्याचे हवाई दलाच्या गुजरात विभागाचे मुख्य पीआरओ एम.जी.मेहता यांनी स्पष्ट केलंय. हेलिकॉप्टर चालवणारे ट्रेनिंगवर असल्याची माहिती मिळती.

जामनगर एअरबेसपासून 15 किलोमिटर अंतरावर हवेत या दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. एमआई-17 हेलिकॉप्टर हे वायुदलातील मोठे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरची आसनक्षमता दहा लोकांची असून या दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये 4-4 लोक प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरमध्ये अधिकार्‍यांसोबत दोन्ही चालक हे ट्रेनी असल्याचं सांगण्यात येतं आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वायुदलाकडून थरारक प्रात्यक्षिक आपल्याला पाह्याला मिळेते. सदरील घटनेच्या वेळी असा प्रयत्न केला गेला. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांपासून जवळून जाण्याचा प्रयत्न केला पण दुदैर्वाने टक्कर झाली. या अपघातात कोणीही बचावण्याची शक्यता फार कमी आहे. या अपघात प्रकरणी चालकांनी कॉकपिटच्या नियमांचा भंग केला का याची चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close