S M L

बिग बी रसुल पुकुट्टींच्या सिनेमात

28 ऑगस्टबॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन नेहमीच विविध भूमिकेतून आपल्या समोर येतो. सध्या चर्चा आहे ती त्यांच्या केबीसीच्या नव्या सिझनची...7 सप्टेंबरपासून सुरू होणारा कौन बनेगा करोडपती या शोमधून बिग बींची नवी स्टाईल पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळेल. पण आता त्यांची आणखी एक चॅलेंजिंग भूमिका आपल्या समोर येणार आहे. ऑस्कर विजेता रसुल पुकुट्टीच्या आगामी सिनेमातून बीग बी नव्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. साऊंड डिझायनर रसुल पुकुट्टी पहिल्यांदाच सिनेमा दिग्दर्शीत करत आहे. या सिनेमात बीग बी एका पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेत असून हा सिनेमा भारत-पाकिस्तान संबंधावर आधारीत आहे. या अगोदरही बीग बी यांनी पाकीस्तानमधील तुरुंगावर बेतलेला दिवारा सिनेमा केला होता. बुम, पा, निशब्द अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून बीग बींनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे ऑस्कर विजेता रसुल पुकुट्टींच्या चित्रपटात बीग बी कसे दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 04:54 PM IST

बिग बी रसुल पुकुट्टींच्या सिनेमात

28 ऑगस्ट

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन नेहमीच विविध भूमिकेतून आपल्या समोर येतो. सध्या चर्चा आहे ती त्यांच्या केबीसीच्या नव्या सिझनची...7 सप्टेंबरपासून सुरू होणारा कौन बनेगा करोडपती या शोमधून बिग बींची नवी स्टाईल पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळेल. पण आता त्यांची आणखी एक चॅलेंजिंग भूमिका आपल्या समोर येणार आहे. ऑस्कर विजेता रसुल पुकुट्टीच्या आगामी सिनेमातून बीग बी नव्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. साऊंड डिझायनर रसुल पुकुट्टी पहिल्यांदाच सिनेमा दिग्दर्शीत करत आहे. या सिनेमात बीग बी एका पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेत असून हा सिनेमा भारत-पाकिस्तान संबंधावर आधारीत आहे. या अगोदरही बीग बी यांनी पाकीस्तानमधील तुरुंगावर बेतलेला दिवारा सिनेमा केला होता. बुम, पा, निशब्द अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून बीग बींनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे ऑस्कर विजेता रसुल पुकुट्टींच्या चित्रपटात बीग बी कसे दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close