S M L

मध्यमवर्गीय मुलींना आरोग्यापेक्षा,सौंदर्याची काळजी - मोदी

30 ऑगस्टमध्यमवर्गीय मुली ह्या आरोग्यापेक्षा, सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. आणि त्यामुळे मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाणं वाढलं आहे. आईनी जर मुलीला दूध प्यायला सांगितलं तर ती म्हणते दूध नको, नाहीतर मी जाड होईल असं वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.एकीकडे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची भाजपतील मोदी समर्थकांना स्वप्न पडत आहे तर दुसरीकडे वास्तवात मोदींना एक पाठोपाठ एक झटके बसत आहे. काल बुधवारीच नरोडिया पाटिया दंगल प्रकरणी भाजपच्या आमदार माया कोडनानींना कोर्टाने दोषी ठरवलंय. हा निर्णय मोदी सरकारला मोठा झटका आहे. आणि आज खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द अमेरिकनं वृत्तपत्र 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखती बुचकळ्यात टाकणारे वक्तव्य करुन अडचणी ओढावून घेतल्या आहे. मोदी म्हणतात मध्यमवर्गीय मुली ह्या आरोग्यापेक्षा, सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. आणि त्यामुळे मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाणं वाढलंय. आईनी जर मुलीला दूध प्यायला सांगितलं तर ती म्हणते दूध नको, नाहीतर मी जाड होईल असं विधान मोदींनी केलं आहे. गुजरात औद्योगिक क्षेत्रात पुढे, वीज निर्मिती पुढे,आर्थिक विकासातही गुजरात पुढे असं सांगणार्‍या मोदींच्या राज्यात कुपोषणाचा आकडा हा धक्कादायक आहे. जवळपास 41 टक्के मुलांचे वजन हे गरजेपेक्षा कमी आहे. 5 वर्षापेक्षा कमी वयाची 6 टक्के कोवळ्या मुलांचा भुकेमुळे मृत्यू होतो. 22 टक्के टक्के जनतेला एकावेळचे जेवण मिळत नाही. यासगळ्या आकडेवारीकडे मोदींनी दुर्लक्ष करत वेगळाचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे मोदींच्या या विधानावर सगळीकडून सडकून टीका होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2012 11:33 AM IST

मध्यमवर्गीय मुलींना आरोग्यापेक्षा,सौंदर्याची काळजी - मोदी

30 ऑगस्ट

मध्यमवर्गीय मुली ह्या आरोग्यापेक्षा, सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. आणि त्यामुळे मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाणं वाढलं आहे. आईनी जर मुलीला दूध प्यायला सांगितलं तर ती म्हणते दूध नको, नाहीतर मी जाड होईल असं वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

एकीकडे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची भाजपतील मोदी समर्थकांना स्वप्न पडत आहे तर दुसरीकडे वास्तवात मोदींना एक पाठोपाठ एक झटके बसत आहे. काल बुधवारीच नरोडिया पाटिया दंगल प्रकरणी भाजपच्या आमदार माया कोडनानींना कोर्टाने दोषी ठरवलंय. हा निर्णय मोदी सरकारला मोठा झटका आहे. आणि आज खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द अमेरिकनं वृत्तपत्र 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखती बुचकळ्यात टाकणारे वक्तव्य करुन अडचणी ओढावून घेतल्या आहे. मोदी म्हणतात मध्यमवर्गीय मुली ह्या आरोग्यापेक्षा, सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. आणि त्यामुळे मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाणं वाढलंय. आईनी जर मुलीला दूध प्यायला सांगितलं तर ती म्हणते दूध नको, नाहीतर मी जाड होईल असं विधान मोदींनी केलं आहे. गुजरात औद्योगिक क्षेत्रात पुढे, वीज निर्मिती पुढे,आर्थिक विकासातही गुजरात पुढे असं सांगणार्‍या मोदींच्या राज्यात कुपोषणाचा आकडा हा धक्कादायक आहे. जवळपास 41 टक्के मुलांचे वजन हे गरजेपेक्षा कमी आहे. 5 वर्षापेक्षा कमी वयाची 6 टक्के कोवळ्या मुलांचा भुकेमुळे मृत्यू होतो. 22 टक्के टक्के जनतेला एकावेळचे जेवण मिळत नाही. यासगळ्या आकडेवारीकडे मोदींनी दुर्लक्ष करत वेगळाचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे मोदींच्या या विधानावर सगळीकडून सडकून टीका होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2012 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close