S M L

भंडार्‍यात शासकीय दूध केंद्रातच भेसळखोरी उघड

31 ऑगस्टभंडारा जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त केलंय. विषेश म्हणजे जिल्हातील शासकीय दूध केंद्रातून दूध जप्त करण्यात आलं. केंद्रातील सुपरवाझर राजेंद्र डोळे याला भेसळप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा इथल्या शासकीय दूग्ध शितकरण केंद्रात हा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील विविध ठिकाणाहून या केंद्रात दूध संकलित होते. आणि त्यावर प्रक्रिया करुन चंद्रपूरला पाठवण्यात येते. डोळे दुधाची पातळी वाढवण्यासाठी मालटी डेक्साट्रिन आणि ग्लुकोज पावडर मिसळवत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2012 02:43 PM IST

भंडार्‍यात शासकीय दूध केंद्रातच भेसळखोरी उघड

31 ऑगस्ट

भंडारा जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त केलंय. विषेश म्हणजे जिल्हातील शासकीय दूध केंद्रातून दूध जप्त करण्यात आलं. केंद्रातील सुपरवाझर राजेंद्र डोळे याला भेसळप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा इथल्या शासकीय दूग्ध शितकरण केंद्रात हा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील विविध ठिकाणाहून या केंद्रात दूध संकलित होते. आणि त्यावर प्रक्रिया करुन चंद्रपूरला पाठवण्यात येते. डोळे दुधाची पातळी वाढवण्यासाठी मालटी डेक्साट्रिन आणि ग्लुकोज पावडर मिसळवत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2012 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close