S M L

रिव्हर व्ह्यू हॉटेलवर शिवसेनेची धडक मोर्चा

30 ऑगस्टपुण्यातील चिल्लर पार्टी प्रकरणी रिव्हर व्ह्यू हॉटेलवर आज पुण्यात शिवसेनेने धडक मोर्चा काढला. हॉटेल मालक जयंत पवार यांच्याविरूध्द कारवाईची शिवसेनेनं मागणी केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.25 ऑगस्टला रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांची पार्टी आयोजित करण्यात आली होती. हॉटेलचे मालक जयंत पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चुलत भाऊ आहेत. याप्रकरणी काल बुधवारी पुणे पोलिसांनी आयोजकांना दोषी ठरवत जयंत पवार यांना क्लीन चीट दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2012 01:20 PM IST

रिव्हर व्ह्यू हॉटेलवर शिवसेनेची धडक मोर्चा

30 ऑगस्ट

पुण्यातील चिल्लर पार्टी प्रकरणी रिव्हर व्ह्यू हॉटेलवर आज पुण्यात शिवसेनेने धडक मोर्चा काढला. हॉटेल मालक जयंत पवार यांच्याविरूध्द कारवाईची शिवसेनेनं मागणी केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.25 ऑगस्टला रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांची पार्टी आयोजित करण्यात आली होती. हॉटेलचे मालक जयंत पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चुलत भाऊ आहेत. याप्रकरणी काल बुधवारी पुणे पोलिसांनी आयोजकांना दोषी ठरवत जयंत पवार यांना क्लीन चीट दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2012 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close