S M L

सचिन तिसर्‍यांदा क्लिन बोल्ड

03 सप्टेंबरमला अजून क्रिकेट खेळायचं आहे, अजून निवृत्तीचा विचार नाही असं वारंवार सांगणार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमझ्ये तिसर्‍यांदा बोल्ड आऊट झाला आहे. बंगळुरु टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे. भारताने 4 विकेट गमावत 158 रन्स केलेत आणि विजयासाठी भारताला आणखी 103 रन्सची गरज आहे. पण या मॅचमध्येही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्लीन बोल्ड झाला. टीम साऊथीने सचिनला 27 रन्सवर बोल्ड केलं. क्लिन बोल्ड होण्याची सचिनची ही सलग तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे बोल्ड होण्याची त्याची पध्दतही तीच होती. बॅट आणि पॅडच्यामधून बॉल स्टम्पवर आदळला आणि सचिन क्लिन बोल्ड झाला. एका दिवसापूर्वीच लिटील मास्टर सुनील गावसकरने सचिनच्या फुटवर्कवर टीका केली होती. सचिनवर वाढत्या वयाचा परिणाम जाणवतोय असंही गावसकर यांनी म्हटलं होतं. याला सचिन बॅटनं कसं उत्तर देतो हे पाहण्याची उत्सुकता होती. पण चाहत्यांची निराशा झाली. सचिन दुसर्‍या इनिंगमध्येही क्लिन बोल्ड झाला. सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर यांनी नेमकं काय म्हटलं ?सचिनच्या फुटवर्कवर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्यात. बॅट आणि पॅडमधील मोठं अंतर चिंताजनक आहे. - सुनील गावसकरसचिनची बॅट सरळ रेषेत पुढे आली, पण पाय इंचही हलला नाही. आणि याच गॅपमधून बॉल स्टम्पवर आदळला. - संजय मांजरेकर

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 10:33 AM IST

सचिन तिसर्‍यांदा क्लिन बोल्ड

03 सप्टेंबर

मला अजून क्रिकेट खेळायचं आहे, अजून निवृत्तीचा विचार नाही असं वारंवार सांगणार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमझ्ये तिसर्‍यांदा बोल्ड आऊट झाला आहे. बंगळुरु टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे. भारताने 4 विकेट गमावत 158 रन्स केलेत आणि विजयासाठी भारताला आणखी 103 रन्सची गरज आहे. पण या मॅचमध्येही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्लीन बोल्ड झाला. टीम साऊथीने सचिनला 27 रन्सवर बोल्ड केलं. क्लिन बोल्ड होण्याची सचिनची ही सलग तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे बोल्ड होण्याची त्याची पध्दतही तीच होती. बॅट आणि पॅडच्यामधून बॉल स्टम्पवर आदळला आणि सचिन क्लिन बोल्ड झाला. एका दिवसापूर्वीच लिटील मास्टर सुनील गावसकरने सचिनच्या फुटवर्कवर टीका केली होती. सचिनवर वाढत्या वयाचा परिणाम जाणवतोय असंही गावसकर यांनी म्हटलं होतं. याला सचिन बॅटनं कसं उत्तर देतो हे पाहण्याची उत्सुकता होती. पण चाहत्यांची निराशा झाली. सचिन दुसर्‍या इनिंगमध्येही क्लिन बोल्ड झाला. सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर यांनी नेमकं काय म्हटलं ?

सचिनच्या फुटवर्कवर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्यात. बॅट आणि पॅडमधील मोठं अंतर चिंताजनक आहे. - सुनील गावसकर

सचिनची बॅट सरळ रेषेत पुढे आली, पण पाय इंचही हलला नाही. आणि याच गॅपमधून बॉल स्टम्पवर आदळला. - संजय मांजरेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close