S M L

कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीचा प्रस्ताव ?

01 सप्टेंबरकोळसा खाण घोटाळ्यावरुन गेल्या आठ दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प आहे. संसदेतील कोंडी फोडण्याचा प्रयत्न आता सरकारने सुरू केला आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची काल संध्याकाळी बैठक झाली. त्यात कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी भाजपला एक ऑफर देण्याचा प्रस्ताव हायकमांडनी मांडला. सीबीआय तपासासोबतच कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही कोळसा खाणींचं पुन्हा मूल्यांकन करायलाही काँग्रेस तयार असल्याचं समजतंय. या आठवड्याच्या शेवटी हा प्रस्ताव भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2012 11:12 AM IST

कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीचा प्रस्ताव ?

01 सप्टेंबर

कोळसा खाण घोटाळ्यावरुन गेल्या आठ दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प आहे. संसदेतील कोंडी फोडण्याचा प्रयत्न आता सरकारने सुरू केला आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची काल संध्याकाळी बैठक झाली. त्यात कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी भाजपला एक ऑफर देण्याचा प्रस्ताव हायकमांडनी मांडला. सीबीआय तपासासोबतच कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही कोळसा खाणींचं पुन्हा मूल्यांकन करायलाही काँग्रेस तयार असल्याचं समजतंय. या आठवड्याच्या शेवटी हा प्रस्ताव भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2012 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close