S M L

आघाडीच्या नेत्यांनी लाटले शेतकर्‍यांचे शेततळे

01 सप्टेंबरजलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी नातेवाईकांच्या नावाने 140 कंपन्याचा पराक्रम केला होता. याचा 'आदर्श' घेऊन राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना-अंतर्गत दिले जाणारे पॅक हाऊस आणि शेततळे राष्ट्रवादीचे माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आणि काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी लाटल्याचे उघड झाले आहे. जिल्हा अधिक्षकांच्या साह्याने आपल्या नातेवाईकांचे नाव यादीत टाकून शेततळे लाटल्याचा आरोप शेतकरी करत आहे.परभणीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना-अंतर्गत शेतकरी आणि गरजूना पॅक हाऊस आणि शेततळे दिले जातात मात्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकर्‍यांना पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, सामुहीक शेततळे यासाठी 50 आणि 100 टक्के अनुदान दिलं जातं आहे. लाभार्थ्यांच्या यादीत राजकारण्यांच्या नातेवाईकांचा समावेश केल्याचं उघड झालंय. जिंतूरचे काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या 3 मुली आणि पत्नी यांच्या नावानं 4 पॅकहाऊस देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी चक्क आपल्या नावाने आणि पत्नीच्या नावाने 2 शेततळे लाटले आहे.अनेक पात्र शेतकर्‍यांना डावलून एकाच कुंटुबात 4 पॅकहाऊस आणि 2 शेततळे कसे दिले जावू शकतात, असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2012 11:24 AM IST

आघाडीच्या नेत्यांनी लाटले शेतकर्‍यांचे शेततळे

01 सप्टेंबर

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी नातेवाईकांच्या नावाने 140 कंपन्याचा पराक्रम केला होता. याचा 'आदर्श' घेऊन राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना-अंतर्गत दिले जाणारे पॅक हाऊस आणि शेततळे राष्ट्रवादीचे माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आणि काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी लाटल्याचे उघड झाले आहे. जिल्हा अधिक्षकांच्या साह्याने आपल्या नातेवाईकांचे नाव यादीत टाकून शेततळे लाटल्याचा आरोप शेतकरी करत आहे.

परभणीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना-अंतर्गत शेतकरी आणि गरजूना पॅक हाऊस आणि शेततळे दिले जातात मात्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकर्‍यांना पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, सामुहीक शेततळे यासाठी 50 आणि 100 टक्के अनुदान दिलं जातं आहे. लाभार्थ्यांच्या यादीत राजकारण्यांच्या नातेवाईकांचा समावेश केल्याचं उघड झालंय. जिंतूरचे काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या 3 मुली आणि पत्नी यांच्या नावानं 4 पॅकहाऊस देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी चक्क आपल्या नावाने आणि पत्नीच्या नावाने 2 शेततळे लाटले आहे.अनेक पात्र शेतकर्‍यांना डावलून एकाच कुंटुबात 4 पॅकहाऊस आणि 2 शेततळे कसे दिले जावू शकतात, असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close