S M L

कोल्हापूरकर जिंकले, 'जयप्रभा'च्या विक्रीला कोर्टाची स्थगिती

03 सप्टेंबरमराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला स्थगिती मिळाली आहे. कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयाने या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय एकअर्थी कोल्हापूरकांचा विजय आहे. 1944 साली भालजी पेंढारकर यांनी या स्टुडिओ खरेदी केला होता. या स्टुडिओत चित्रपट महर्षी व्ही.शांतारामस भालजी पेंढारकर यांनी विविध कलाकृती इथं घडवल्या होत्या. कालांतराने या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर कुटुंबीयांकडे आली. गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओ विकला जाणार असल्याची कुणकुण कोल्हापूरवासीयांना लागली. त्यांच्या निर्णयाच्या विरोधात कोल्हापूकर आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ रस्त्यावर उतरले. जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे. लतादीदींना हा स्टुडिओ विकण्याची इतकी घाई का ? जर लतादीदींना पैशांची कमी असेल तर आम्ही कोल्हापूरकर गोळा करुन देऊ असं सांगत भीक मागो आंदोलन कोल्हापूरकरांनी केलं होतं. लतादीदींच्या या निर्णयाविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने कोर्टात धाव घेतली. आणि अखेर कोर्टाने त्यांच्या बाजून निर्णय कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 12:49 PM IST

कोल्हापूरकर जिंकले, 'जयप्रभा'च्या विक्रीला कोर्टाची स्थगिती

03 सप्टेंबर

मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला स्थगिती मिळाली आहे. कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयाने या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय एकअर्थी कोल्हापूरकांचा विजय आहे.

1944 साली भालजी पेंढारकर यांनी या स्टुडिओ खरेदी केला होता. या स्टुडिओत चित्रपट महर्षी व्ही.शांतारामस भालजी पेंढारकर यांनी विविध कलाकृती इथं घडवल्या होत्या. कालांतराने या स्टुडिओची मालकी लता मंगेशकर कुटुंबीयांकडे आली. गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओ विकला जाणार असल्याची कुणकुण कोल्हापूरवासीयांना लागली. त्यांच्या निर्णयाच्या विरोधात कोल्हापूकर आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ रस्त्यावर उतरले. जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे. लतादीदींना हा स्टुडिओ विकण्याची इतकी घाई का ? जर लतादीदींना पैशांची कमी असेल तर आम्ही कोल्हापूरकर गोळा करुन देऊ असं सांगत भीक मागो आंदोलन कोल्हापूरकरांनी केलं होतं. लतादीदींच्या या निर्णयाविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने कोर्टात धाव घेतली. आणि अखेर कोर्टाने त्यांच्या बाजून निर्णय कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close