S M L

बंगळूर टेस्ट:पहिल्यादिवशी भारत 5 बाद 283

01 सप्टेंबरबंगळूरु टेस्टमध्ये पहिल्या इनिगमध्ये भारताची खराब सुरुवात झाली. गौतम गंभीर,सेहवाग,सचिन या पहिल्या फळीला धक्का देत पव्हेलियनमध्ये पाठवले अवघ्या 100 धावांत 4 खेळाडू माघारी फिरले. पण कर्णधार धोणी आणि विराटच्या जोरदार बॅटिंगमुळे भारताची इनिंग सावरली.पहिल्या दिवसावर न्यूझीलंडच्या बॅट्समनचं वर्चस्व राहिलं होतं. तर दुसर्‍या दिवशीही बॅट्समननीच वर्चस्व राखलं. पहिल्या दिवसअखेर 6 विकेट गमावत न्यूझीलंडनं 328 रन्सचा स्कोर उभारला होता. पण आजच्या पहिल्याच सेशनमध्ये भारतीय बॉलर्सने न्यूझीलंडला 365 रन्सवर ऑलआऊट केलं. पण भारताच्या पहिल्या इनिंगची सुरुवात अत्यंत खराब झाली. इनिंगच्या सुरुवातीलाच टीम साऊदीने गौतम गंभीरला क्लीन बोल्ड करत भारतीय इनिंगला धक्का दिला. तर त्यानंतर साऊदी आणि ब्रेसवेल जोडीने सेहवाग, पुजारा आणि सचिनलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 100 रन्समध्येच भारताचे चार प्रमुख बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाची जोडी जमली. संयमी बॅटिंग करत या जोडीनं भारताचा स्कोरबोर्ड हलता ठेवला. काही अप्रतिम शॉट्स मारत रैनानं आपली हाफ सेंच्युरी ठोकली. पण त्यानंतर साऊदीनंच रैनाची विकेट घेत ही जोडी फोडली. पण त्यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोणीनं जम बसलेल्या कोहलीला चांगली साथ दिली. दिवसअखेर विराट कोहली सेंच्युरीच्या तर कॅप्टन महेंद्र सिंग धोणी हाफ सेंच्युरीच्या उंबरठ्यावर आहे. कोहली 93 तर धोणी 46 रन्स करत पीचवर जम बसवून आहेत. तर पहिल्या इनिंगमध्ये भारतानं दुसर्‍या दिवसअखेर 5 विकेट गमावत 283 रन्स केलेत. पहिल्या इनिंगमध्ये भारत अजूनही 82 रन्सनं पिछाडीवर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2012 03:55 PM IST

बंगळूर टेस्ट:पहिल्यादिवशी भारत 5 बाद 283

01 सप्टेंबर

बंगळूरु टेस्टमध्ये पहिल्या इनिगमध्ये भारताची खराब सुरुवात झाली. गौतम गंभीर,सेहवाग,सचिन या पहिल्या फळीला धक्का देत पव्हेलियनमध्ये पाठवले अवघ्या 100 धावांत 4 खेळाडू माघारी फिरले. पण कर्णधार धोणी आणि विराटच्या जोरदार बॅटिंगमुळे भारताची इनिंग सावरली.

पहिल्या दिवसावर न्यूझीलंडच्या बॅट्समनचं वर्चस्व राहिलं होतं. तर दुसर्‍या दिवशीही बॅट्समननीच वर्चस्व राखलं. पहिल्या दिवसअखेर 6 विकेट गमावत न्यूझीलंडनं 328 रन्सचा स्कोर उभारला होता. पण आजच्या पहिल्याच सेशनमध्ये भारतीय बॉलर्सने न्यूझीलंडला 365 रन्सवर ऑलआऊट केलं. पण भारताच्या पहिल्या इनिंगची सुरुवात अत्यंत खराब झाली. इनिंगच्या सुरुवातीलाच टीम साऊदीने गौतम गंभीरला क्लीन बोल्ड करत भारतीय इनिंगला धक्का दिला. तर त्यानंतर साऊदी आणि ब्रेसवेल जोडीने सेहवाग, पुजारा आणि सचिनलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 100 रन्समध्येच भारताचे चार प्रमुख बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाची जोडी जमली. संयमी बॅटिंग करत या जोडीनं भारताचा स्कोरबोर्ड हलता ठेवला. काही अप्रतिम शॉट्स मारत रैनानं आपली हाफ सेंच्युरी ठोकली. पण त्यानंतर साऊदीनंच रैनाची विकेट घेत ही जोडी फोडली. पण त्यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोणीनं जम बसलेल्या कोहलीला चांगली साथ दिली. दिवसअखेर विराट कोहली सेंच्युरीच्या तर कॅप्टन महेंद्र सिंग धोणी हाफ सेंच्युरीच्या उंबरठ्यावर आहे. कोहली 93 तर धोणी 46 रन्स करत पीचवर जम बसवून आहेत. तर पहिल्या इनिंगमध्ये भारतानं दुसर्‍या दिवसअखेर 5 विकेट गमावत 283 रन्स केलेत. पहिल्या इनिंगमध्ये भारत अजूनही 82 रन्सनं पिछाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2012 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close