S M L

'चिल्लर पार्टी' प्रकरणी जयंत पवारांना जामीन

04 सप्टेंबरचिल्लर पार्टी प्रकरणी अजित पवार यांचे भाऊ आणि हॉटेल रिव्हर व्ह्यु चे मालक जयंत पवार यांना कोर्टाने 10 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. पुण्याच्या लष्कर कोर्टाने हा जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलांच्या या पार्टीच्या प्रकरणामध्ये काल जयंत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस स्टेशन मधून त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार जयंत पवार हे आज सकाळी लष्कर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जयंत पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये सर्व परवानग्या घेऊन त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने पार्टी आयोजित केली होती. साधारण 200 जणांसाठी असणार्‍या या हॉटेल मध्ये नंतर 700 लोकं कशी आली आम्हाला माहित नाही अशी बाजू वकिलांनी मांडली. मात्र जर एखादी जागा भाडे तत्वावर दिलेली आहे तर तिथे काय होतंय हे पाहण्याची जबाबदारी तुमची नाही का? असा प्रश्न कोर्टाने विचारला. त्यानंतर कोर्टाने त्यांना 10 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 10:51 AM IST

'चिल्लर पार्टी' प्रकरणी जयंत पवारांना जामीन

04 सप्टेंबर

चिल्लर पार्टी प्रकरणी अजित पवार यांचे भाऊ आणि हॉटेल रिव्हर व्ह्यु चे मालक जयंत पवार यांना कोर्टाने 10 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. पुण्याच्या लष्कर कोर्टाने हा जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलांच्या या पार्टीच्या प्रकरणामध्ये काल जयंत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस स्टेशन मधून त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार जयंत पवार हे आज सकाळी लष्कर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जयंत पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये सर्व परवानग्या घेऊन त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने पार्टी आयोजित केली होती. साधारण 200 जणांसाठी असणार्‍या या हॉटेल मध्ये नंतर 700 लोकं कशी आली आम्हाला माहित नाही अशी बाजू वकिलांनी मांडली. मात्र जर एखादी जागा भाडे तत्वावर दिलेली आहे तर तिथे काय होतंय हे पाहण्याची जबाबदारी तुमची नाही का? असा प्रश्न कोर्टाने विचारला. त्यानंतर कोर्टाने त्यांना 10 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close