S M L

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

03 सप्टेंबरदुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या मराठवाड्याला अखेर पावसाने दिलासा दिला आहे. मराठवाड्यात सर्वत्र पावसाचं आगमन झालंय. गेल्या दोन महिन्यापासून वरुणराजानी मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बीडमध्ये अंबाजोगाई आणि वडवणी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. अगोदरच्या दुष्काळाच्या झळा आणि त्यात पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदील झाले होते. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सिल्लोड येथे तर आंघोळीचे पाणी साठवून ते इतर कामासाठी वापरण्याची परिस्थिती आली आहे. आता पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात असाच पाऊस राहिल्यास दुष्काळापासूनही थोडा दिलासा मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 08:26 AM IST

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

03 सप्टेंबर

दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या मराठवाड्याला अखेर पावसाने दिलासा दिला आहे. मराठवाड्यात सर्वत्र पावसाचं आगमन झालंय. गेल्या दोन महिन्यापासून वरुणराजानी मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बीडमध्ये अंबाजोगाई आणि वडवणी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. अगोदरच्या दुष्काळाच्या झळा आणि त्यात पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदील झाले होते. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सिल्लोड येथे तर आंघोळीचे पाणी साठवून ते इतर कामासाठी वापरण्याची परिस्थिती आली आहे. आता पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात असाच पाऊस राहिल्यास दुष्काळापासूनही थोडा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close