S M L

वर्ध्यात धो-धो पाऊस, जनजीवन विस्कळीत

05 सप्टेंबरवर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. निम्न वर्धा धरणाचे 17, अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे आर्वीत नाल्याला आलेल्या पुरामुळे 3 जण वाहून गेले आहे. आष्टी तालुक्यात बकाली नदीला आलेल्या पुरामुळे आनंदवाडी , चिस्तुर , बेलोरा , जळगाव , शिरपूर, नांदपूर या नदीकाठावरील गावात पाणी शिरलं आहे. वर्धमनेरीत 27 घरांची पडझड झाली आहे. घरांच्या भिंती पडल्याने 12 जनावरांचा मृत्यू झालाआहे. आर्वीच्या जनता नगरातही नाल्याचे पाणी घुसल्याने तेथील रहिवाशाांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदीनाल्याना आलेल्या पुरामुळे राळेगाव - वर्धा राज्य महामार्ग, मन्सावली - अल्लीपूर मार्ग बंद झाला आहे.अमरावतीत धरणं तुडुंबअमरावती जिल्ह्यात काल रात्रीपासून सतत संततधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणं भरुन वहात आहेत. अमरावती धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात अनेक भागात घरांमध्ये पाणी घुसलं आहे. यामुळे नागरिकांनी आसपासच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. जिल्ह्यातल्या साहूर गावातही 300 - 400 घरांमध्ये पाणी घुसलं आहे. अमरावतीनजीकच्या बोरगाव धमोळे गावातही अनेक घरांमध्ये पाणी भरलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 10:32 AM IST

वर्ध्यात धो-धो पाऊस, जनजीवन विस्कळीत

05 सप्टेंबर

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. निम्न वर्धा धरणाचे 17, अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे आर्वीत नाल्याला आलेल्या पुरामुळे 3 जण वाहून गेले आहे. आष्टी तालुक्यात बकाली नदीला आलेल्या पुरामुळे आनंदवाडी , चिस्तुर , बेलोरा , जळगाव , शिरपूर, नांदपूर या नदीकाठावरील गावात पाणी शिरलं आहे. वर्धमनेरीत 27 घरांची पडझड झाली आहे. घरांच्या भिंती पडल्याने 12 जनावरांचा मृत्यू झालाआहे. आर्वीच्या जनता नगरातही नाल्याचे पाणी घुसल्याने तेथील रहिवाशाांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदीनाल्याना आलेल्या पुरामुळे राळेगाव - वर्धा राज्य महामार्ग, मन्सावली - अल्लीपूर मार्ग बंद झाला आहे.

अमरावतीत धरणं तुडुंब

अमरावती जिल्ह्यात काल रात्रीपासून सतत संततधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणं भरुन वहात आहेत. अमरावती धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात अनेक भागात घरांमध्ये पाणी घुसलं आहे. यामुळे नागरिकांनी आसपासच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. जिल्ह्यातल्या साहूर गावातही 300 - 400 घरांमध्ये पाणी घुसलं आहे. अमरावतीनजीकच्या बोरगाव धमोळे गावातही अनेक घरांमध्ये पाणी भरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close