S M L

पुण्यामध्ये गणेश विसर्जनात ढोल-ताशांचा निनाद रात्रभर

04 सप्टेंबरसांस्कृतीक शहर पुण्यात यंदा बाप्पांना निरोप देण्यासाठी रात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकर आणि रात्रभर वाद्य वाजवण्याच्या परवानगी देण्यात आली आहे. पण यामाध्ये डीजेला वगळण्यात आलं आहे. पारंपारिक वाद्य ढोल-ताशा,बॅन्ड बाजा, मृदुंग वाजवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुण्यात बाप्पांना निरोप देण्यासाठी पोलिसांनी एका पध्दतीने हातभार लावला आहे. पण आवाजाची मर्यादाही घालण्यात आली आहे. याबद्दल आज मुंबईत एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीनूसार आवाज मर्यादा पाळणार असं वचन गणेश मंडळांनी दिलं आहे. त्याचबरोबर पुण्यात गेल्या वर्षी दाखल केलेले 155 गणेश मंडळांवरचे गुन्हे मागे घेतल्याचंही गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज सांगितलंय. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 02:29 PM IST

पुण्यामध्ये गणेश विसर्जनात ढोल-ताशांचा निनाद रात्रभर

04 सप्टेंबर

सांस्कृतीक शहर पुण्यात यंदा बाप्पांना निरोप देण्यासाठी रात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकर आणि रात्रभर वाद्य वाजवण्याच्या परवानगी देण्यात आली आहे. पण यामाध्ये डीजेला वगळण्यात आलं आहे. पारंपारिक वाद्य ढोल-ताशा,बॅन्ड बाजा, मृदुंग वाजवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुण्यात बाप्पांना निरोप देण्यासाठी पोलिसांनी एका पध्दतीने हातभार लावला आहे. पण आवाजाची मर्यादाही घालण्यात आली आहे. याबद्दल आज मुंबईत एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीनूसार आवाज मर्यादा पाळणार असं वचन गणेश मंडळांनी दिलं आहे. त्याचबरोबर पुण्यात गेल्या वर्षी दाखल केलेले 155 गणेश मंडळांवरचे गुन्हे मागे घेतल्याचंही गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज सांगितलंय. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close