S M L

चोरानेच घातल्या पोलिसांना 'बेड्या'

05 सप्टेंबरआपण नेहमी पोलिसांनी चोराला अटक केल्याची बातमी ऐकतो. पण पंढरपुरात एका वाळू चोरानेच दोन पोलीस अधिकारार्‍यांना अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकवलं आहे. याप्रकरणी हवालदार देसाई यांनी अटक करण्यात आली आहे. सुनील वाघ या वाळूचोराचा ट्रॅक्टर पोलीस हवालदार विष्णू देसाई यांनी जप्त केला. ट्रॅक्टरच्या मालकांविरूध्दही गुन्हा दाखल करू असा इशारा दिला. आणि ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली. याबाबत सुनील वाघने पोलीस इन्स्पेक्टर धर्मराज ओंबासे यांच्याकडे तक्रार केली. ओंबासे यांनीही लाच द्यावीच लागेल, असं सांगितलं. त्यानंतर सुनील वाघ याने अँटिकरप्शन विभागाकडे तक्रार केली. अँटिकरप्शन विभागाने सापळा रचून हवालदार देसाईला अटक केली. आपलंही नाव या प्रकरणात येणार, असं लक्षात आल्यावर पीआय ओंबासे फरार झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं स्थापन करण्यात आली आहेत. एका चोरामुळे पोलिसांनाच अटक होण्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 02:39 PM IST

चोरानेच घातल्या पोलिसांना 'बेड्या'

05 सप्टेंबर

आपण नेहमी पोलिसांनी चोराला अटक केल्याची बातमी ऐकतो. पण पंढरपुरात एका वाळू चोरानेच दोन पोलीस अधिकारार्‍यांना अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकवलं आहे. याप्रकरणी हवालदार देसाई यांनी अटक करण्यात आली आहे. सुनील वाघ या वाळूचोराचा ट्रॅक्टर पोलीस हवालदार विष्णू देसाई यांनी जप्त केला. ट्रॅक्टरच्या मालकांविरूध्दही गुन्हा दाखल करू असा इशारा दिला. आणि ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली. याबाबत सुनील वाघने पोलीस इन्स्पेक्टर धर्मराज ओंबासे यांच्याकडे तक्रार केली. ओंबासे यांनीही लाच द्यावीच लागेल, असं सांगितलं. त्यानंतर सुनील वाघ याने अँटिकरप्शन विभागाकडे तक्रार केली. अँटिकरप्शन विभागाने सापळा रचून हवालदार देसाईला अटक केली. आपलंही नाव या प्रकरणात येणार, असं लक्षात आल्यावर पीआय ओंबासे फरार झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं स्थापन करण्यात आली आहेत. एका चोरामुळे पोलिसांनाच अटक होण्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close