S M L

पुण्यात धरणं तुडुंब मात्र पुणेकरांची भांडी रिकामीच !

प्राची कुलकर्णी, पुणे04 सप्टेंबरपुण्याला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्मंच पाणी देण्यात येईल असं जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला कळवलं आहे. यामुळे धरणं भरत आली आहेत तरीही पुण्यातली पाणीकपात सुरुच राहणार आहे. गरजेनुसार आणि नियमांनुसार पाणी दिलं जात असल्याचं सत्ताधार्‍यांचं म्हणणं आहे. तर पुण्याची लोकसंख्या वाढतेय आणि ही बाब लक्षात न घेता फक्त दौंड-बारामतीला पाणी पुरवता यावं यासाठीच ही काटकसर पुणेकरांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.नाही नाही म्हणता खडकवासला धरण पुर्णपणे भरलंय. इतकंच नाही तर खडकवासला प्रकल्पात येणार्‍या चारही धरणात आता 76 टक्के पाणीसाठा झाल्यानं पाणीकपातीचं संकट टळेल असं पुणेकरांना वाटलं होतं. पण पुणेकरांना पुढची पाच वर्षे पाण्याची काटकसर करतच काढावं लागणार आहे. कारण, नव्या करारानुसार पुण्याला वर्षाला फक्त साडेअकरा टीएमसी पाणी मिळणार आहे. पुण्याला 16 टीमसीपेक्षा जास्त पाण्याची गरज असताना साडेअकरा टिएमसी पाणी कसं पुरणार असा सवाल विचारला जातोय. पण सत्ताधारी हे सगळं राजकारण असल्याचं म्हणताहेत. पुणेकरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार सत्ताधारी करत नसल्याचं पुणे विरोधकांचं म्हणणं आहे. तर निवडणुकांपुर्वी 24 तास पाणीपुरवठा करण्याची आश्वासनं ही निवडणुकीपुरतीच होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. पाण्याच्या या राजकारणात पुणेकर तहानलेलेच राहणार का असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. दरम्यान, पुणे शहराला सध्या दिल्या जाणार्‍या साडेअकरा टीएमसी पेक्षा जास्त पाणी हवं असेल तर एक हजार कोटी रुपये द्या अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. माहितीच्या अधिकारामध्ये ही बाब उघड झाली आहे. पुण्याच्या पाण्याबद्दल सतत वाद निर्माण होतो. त्यामुळे नेमकी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात याचिका केली होती. यानुसार पुणे शहराला एकुण साडेअकरा टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाशी केलेल्या करारानुसार दिले जाते. पुणे शहराला वाढीव पाणी दिल्यास सिंचनाचा कोटा कमी होईल आणि त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होईल. याची नुकसान भरपाई म्हणुन महापालिकेने प्रति हेक्टर एक लाख रुपये द्यावेत असं पाटबंधारे विभागाने कळवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 05:21 PM IST

पुण्यात धरणं तुडुंब मात्र पुणेकरांची भांडी रिकामीच !

प्राची कुलकर्णी, पुणे

04 सप्टेंबर

पुण्याला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्मंच पाणी देण्यात येईल असं जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला कळवलं आहे. यामुळे धरणं भरत आली आहेत तरीही पुण्यातली पाणीकपात सुरुच राहणार आहे. गरजेनुसार आणि नियमांनुसार पाणी दिलं जात असल्याचं सत्ताधार्‍यांचं म्हणणं आहे. तर पुण्याची लोकसंख्या वाढतेय आणि ही बाब लक्षात न घेता फक्त दौंड-बारामतीला पाणी पुरवता यावं यासाठीच ही काटकसर पुणेकरांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

नाही नाही म्हणता खडकवासला धरण पुर्णपणे भरलंय. इतकंच नाही तर खडकवासला प्रकल्पात येणार्‍या चारही धरणात आता 76 टक्के पाणीसाठा झाल्यानं पाणीकपातीचं संकट टळेल असं पुणेकरांना वाटलं होतं. पण पुणेकरांना पुढची पाच वर्षे पाण्याची काटकसर करतच काढावं लागणार आहे. कारण, नव्या करारानुसार पुण्याला वर्षाला फक्त साडेअकरा टीएमसी पाणी मिळणार आहे. पुण्याला 16 टीमसीपेक्षा जास्त पाण्याची गरज असताना साडेअकरा टिएमसी पाणी कसं पुरणार असा सवाल विचारला जातोय. पण सत्ताधारी हे सगळं राजकारण असल्याचं म्हणताहेत.

पुणेकरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार सत्ताधारी करत नसल्याचं पुणे विरोधकांचं म्हणणं आहे. तर निवडणुकांपुर्वी 24 तास पाणीपुरवठा करण्याची आश्वासनं ही निवडणुकीपुरतीच होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

पाण्याच्या या राजकारणात पुणेकर तहानलेलेच राहणार का असा प्रश्न पुणेकरांना पडलाय.

दरम्यान, पुणे शहराला सध्या दिल्या जाणार्‍या साडेअकरा टीएमसी पेक्षा जास्त पाणी हवं असेल तर एक हजार कोटी रुपये द्या अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. माहितीच्या अधिकारामध्ये ही बाब उघड झाली आहे. पुण्याच्या पाण्याबद्दल सतत वाद निर्माण होतो. त्यामुळे नेमकी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात याचिका केली होती. यानुसार पुणे शहराला एकुण साडेअकरा टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाशी केलेल्या करारानुसार दिले जाते. पुणे शहराला वाढीव पाणी दिल्यास सिंचनाचा कोटा कमी होईल आणि त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होईल. याची नुकसान भरपाई म्हणुन महापालिकेने प्रति हेक्टर एक लाख रुपये द्यावेत असं पाटबंधारे विभागाने कळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close