S M L

महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चौघांना अटक

04 सप्टेंबरमुंबईत 11 ऑगस्टला सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चार जणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे. त्यांची ओळख सुध्दा पटली आहे. 11 ऑगस्टला आसाम दंगलीचा निषेध करण्यासाठी रझा अकादमी या संघटनेनं मोर्चा काढला होता. आझाद मैदानावर सभा झाल्यानंतर हिंसक जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच बेस्ट बसेस,मीडियाच्या ओबी व्हॅनला टार्गेट करुन पेटवून दिले. हा हिंसक जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी पोलिसांच्या बंदुका पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकारही घडला.ज्या शहिद जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून 26/11 च्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले त्या शहिद जवानांच्या अमर जवान स्माकराचीही दंगेखोरांनी तोडफोड केल्याची घटनाही घडली. या घटनेच्या प्रकरणी राजकीय पक्षांनी गृहखात्यावर हल्लाबोल केला. आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अरुप पटनायक यांची बढती करुन बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी अजूनही दंगेखोरांना अटक करण्याचे सत्र सुरुच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 05:39 PM IST

महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चौघांना अटक

04 सप्टेंबर

मुंबईत 11 ऑगस्टला सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चार जणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे. त्यांची ओळख सुध्दा पटली आहे. 11 ऑगस्टला आसाम दंगलीचा निषेध करण्यासाठी रझा अकादमी या संघटनेनं मोर्चा काढला होता. आझाद मैदानावर सभा झाल्यानंतर हिंसक जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच बेस्ट बसेस,मीडियाच्या ओबी व्हॅनला टार्गेट करुन पेटवून दिले. हा हिंसक जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी पोलिसांच्या बंदुका पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकारही घडला.ज्या शहिद जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून 26/11 च्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले त्या शहिद जवानांच्या अमर जवान स्माकराचीही दंगेखोरांनी तोडफोड केल्याची घटनाही घडली. या घटनेच्या प्रकरणी राजकीय पक्षांनी गृहखात्यावर हल्लाबोल केला. आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अरुप पटनायक यांची बढती करुन बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी अजूनही दंगेखोरांना अटक करण्याचे सत्र सुरुच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close