S M L

पुण्याला जादा पाण्यासाठी मोजावे लागणार 1 हजार कोटी !

05 सप्टेंबरपुणे शहराला जादा पाणी हवं असेल तर तब्बल एक हजार कोटी रुपये मोजावे लागणार असल्याचे सजग नागरिक मंचानी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये उघड झालं होतं. यानंतर याविरोधात सगळे राजकीय पक्ष एकवटले. पुणे महापालिकेनी पाटबंधारे विभागाशी पाण्याबाबत कोणताही करार करण्यापुर्वी महापालिकेच्या स्थायी समितीला आणि मुख्य सभेची परवानगी घेणं आवश्यक असल्याचा ठराव स्थायी समितीने केला. भाजपच्या सदस्यांकडुन हा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणे शहराला गेल्या वर्षभरात 16 टीएमसी पाण्याची गरज पडली होती.मात्र तरीही महापालिकेकडुन कराराचं नुतनीकरण करताना साडेअकरा टीएमसीसाठीचाच करार करण्यात येतोय. जर यापेक्षा जास्त पाणी मागवलं जाणार असेल तर ज्यादा पैशांची मागणी करण्यात येते आहे.त्यामुळे करार करतानाच मुळात गरज लक्षात घेऊन करावा आणि त्याआधी महापालिके च्या स्थायी समिती आणि मुख्य सभेची परवानगी घ्यावी असा ठराव स्थायी समितीने केला आहे. यामुळे राष्ट्रवादीने अजित पवारांना घरचा आहेर दिला असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी म्हणाले आहे. तर या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचं राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 04:46 PM IST

पुण्याला जादा पाण्यासाठी मोजावे लागणार 1 हजार कोटी !

05 सप्टेंबर

पुणे शहराला जादा पाणी हवं असेल तर तब्बल एक हजार कोटी रुपये मोजावे लागणार असल्याचे सजग नागरिक मंचानी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये उघड झालं होतं. यानंतर याविरोधात सगळे राजकीय पक्ष एकवटले.

पुणे महापालिकेनी पाटबंधारे विभागाशी पाण्याबाबत कोणताही करार करण्यापुर्वी महापालिकेच्या स्थायी समितीला आणि मुख्य सभेची परवानगी घेणं आवश्यक असल्याचा ठराव स्थायी समितीने केला. भाजपच्या सदस्यांकडुन हा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणे शहराला गेल्या वर्षभरात 16 टीएमसी पाण्याची गरज पडली होती.मात्र तरीही महापालिकेकडुन कराराचं नुतनीकरण करताना साडेअकरा टीएमसीसाठीचाच करार करण्यात येतोय.

जर यापेक्षा जास्त पाणी मागवलं जाणार असेल तर ज्यादा पैशांची मागणी करण्यात येते आहे.त्यामुळे करार करतानाच मुळात गरज लक्षात घेऊन करावा आणि त्याआधी महापालिके च्या स्थायी समिती आणि मुख्य सभेची परवानगी घ्यावी असा ठराव स्थायी समितीने केला आहे. यामुळे राष्ट्रवादीने अजित पवारांना घरचा आहेर दिला असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी म्हणाले आहे. तर या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचं राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close