S M L

विदर्भात पावसाचा हाहाकार, 42 जणांचा मृत्यू

06 सप्टेंबरविदर्भतल्या मुसळधार पावसामुळे गेल्या आठवडाभरात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 गुरांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दीड ते दोन हजार घरांची पडझड झालीय. तर 200 च्या वर गावांना पुराचा वेढा पडलाय. अमरावती जिल्ह्यात पावसामुळे काल 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 3 ठिकाणी भिंत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झालाय. तर साखरखेडा शंभू इथं एक तरुण पावसात वाहून गेलाय. धामणगाव इथं ट्रक पुरात वाहून गेलाय. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतीला खुप मोठा फटका बसला. यात शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई देऊन सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2012 10:18 AM IST

विदर्भात पावसाचा हाहाकार, 42 जणांचा मृत्यू

06 सप्टेंबर

विदर्भतल्या मुसळधार पावसामुळे गेल्या आठवडाभरात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 गुरांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दीड ते दोन हजार घरांची पडझड झालीय. तर 200 च्या वर गावांना पुराचा वेढा पडलाय. अमरावती जिल्ह्यात पावसामुळे काल 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 3 ठिकाणी भिंत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झालाय. तर साखरखेडा शंभू इथं एक तरुण पावसात वाहून गेलाय. धामणगाव इथं ट्रक पुरात वाहून गेलाय. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतीला खुप मोठा फटका बसला. यात शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई देऊन सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close