S M L

संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाहीचा भंग - पंतप्रधान

07 सप्टेंबरसंसदेचं पावसाळी अधिवेशन आज गदारोळातच संपलं. त्यानंतर पंतप्रधानांन मनमोहन सिंग यांनी संसदेचं कामकाज बंद पाडल्याबद्दल भाजपवर तोफ डागली. संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाही आणि संसदीय आदर्शांचा भंग असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कॅगबद्दल आपल्याला आदर आहे. पण कुठल्याही अहवालावर संसदेत चर्चा होणे गरजेच आहे. सध्या आपण कोणत्या दिशेन चाललो आहे ? हा लोकशाहीसाठी योग्य मार्ग आहे का ? असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन विरोधकांनी संसदेचं कामकाज 13 दिवशीही बंद पाडले. पावसाळी अधिवेशनाचा शेवटही आज गदारोळातच झाला. लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 11:13 AM IST

संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाहीचा भंग - पंतप्रधान

07 सप्टेंबर

संसदेचं पावसाळी अधिवेशन आज गदारोळातच संपलं. त्यानंतर पंतप्रधानांन मनमोहन सिंग यांनी संसदेचं कामकाज बंद पाडल्याबद्दल भाजपवर तोफ डागली. संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाही आणि संसदीय आदर्शांचा भंग असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कॅगबद्दल आपल्याला आदर आहे. पण कुठल्याही अहवालावर संसदेत चर्चा होणे गरजेच आहे. सध्या आपण कोणत्या दिशेन चाललो आहे ? हा लोकशाहीसाठी योग्य मार्ग आहे का ? असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन विरोधकांनी संसदेचं कामकाज 13 दिवशीही बंद पाडले. पावसाळी अधिवेशनाचा शेवटही आज गदारोळातच झाला. लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close