S M L

ह.मो.मराठेंना प्रचार करु न देण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

07 सप्टेंबरज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे यांना प्रचार करु दिला जाणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ह.मो मराठे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदारांना पाठवलेल्या पत्रकात सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेलं जेम्स लेनचं वादग्रस्त लिखाण छापून राष्ट्रद्रोह केलाय असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. ह. मो मराठे यांनी आपण ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या कार्याबद्दल साहित्य संमेलनाच्या निवडणुकीमधे अपप्रचार केला जाईल अशी शंका व्यक्त करत आपली भूमिका पत्रकाद्वारे मतदारांपुढे मांडली होती. हे पत्रक वादात सापडलं होतं. साहित्य महामंडळाकडे चिपळूणच्या संमेलनातील ह.मो.मराठे यांची उमेदवारी रद्द करायची मागणी केली. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष संतोष शिंदे यांनी ह. मो मराठेंचा निषेध करणारं निवेदन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 12:26 PM IST

ह.मो.मराठेंना प्रचार करु न देण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

07 सप्टेंबर

ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे यांना प्रचार करु दिला जाणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ह.मो मराठे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदारांना पाठवलेल्या पत्रकात सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेलं जेम्स लेनचं वादग्रस्त लिखाण छापून राष्ट्रद्रोह केलाय असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. ह. मो मराठे यांनी आपण ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या कार्याबद्दल साहित्य संमेलनाच्या निवडणुकीमधे अपप्रचार केला जाईल अशी शंका व्यक्त करत आपली भूमिका पत्रकाद्वारे मतदारांपुढे मांडली होती. हे पत्रक वादात सापडलं होतं. साहित्य महामंडळाकडे चिपळूणच्या संमेलनातील ह.मो.मराठे यांची उमेदवारी रद्द करायची मागणी केली. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष संतोष शिंदे यांनी ह. मो मराठेंचा निषेध करणारं निवेदन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close