S M L

'हेरिटेज'मुळे बीडीडीतले रहिवासी धास्तावले

विनोद तळेकर, मुंबई07 सप्टेंबरमुंबईतल्या 947 इमारतींचा समावेश प्रस्तावित हेरिटेज वास्तूंच्या यादीत केला गेला आहे. या यादीत बीडीडी चाळींचाही समावेश करण्यात आलाय. त्यामुळे अगोदरच पुनर्वसनाअभावी त्रस्त असलेल्या बीडीडीतले रहिवासी धास्तावले आहे. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहणारे दिनेश राऊळ...गेली काही वर्ष बीडीडी पुनर्वसनाच्या प्रश्नावर अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून ते पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अगोदरच शासन दरबारी टोलवाटोलवी सुरू असताना आता वरळीतल्या बीडीडी चाळींचा समावेश प्रस्तावित हेरिटेजच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता बीडीडी पुनर्विकास रखडणार की काय अशी धास्ती त्यांना वाटतेय.आमच्या आमदारांना आमची विनंती आहे की या प्रश्नावर तुम्ही रस्त्यावर उतरा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशी मागणी बीडीडी चाळ रहिवासी दिनेश राऊळ करत आहे.मुंबईत वरळी, नायगाव, डिलाईल रोड आणि शिवडी या भागात मिळून एकूण 207 बीडीडी चाळी आहेत. 1921 ते 1925 च्या दरम्यान बांधलेल्या इमारती आता शंभर वर्ष जुन्या होऊन धोकादायक बनल्यात. सध्या फक्त वरळीतल्या बीडीडी चाळींचा समावेश जरी हेरिटेजच्या यादीत झाला असला तरी, त्यामुळे इतर ठिकाणच्या बीडीडींचाही पुनर्विकास रखडेल अशी भीती लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.एकीकडे झोपडीधारकांना एसआरएच्या माध्यमातून घरं मिळत असताना, गेली 60 वर्ष इमानेइतबारे भाडं भरणार्‍या या रहिवाशांना आपल्याला घर कधी मिळणार हा प्रश्न सतावतोय. आणि आता या हेरिटेज यादीमुळे तर घराचं स्वप्न धुसर होताना दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 01:17 PM IST

'हेरिटेज'मुळे बीडीडीतले रहिवासी धास्तावले

विनोद तळेकर, मुंबई

07 सप्टेंबर

मुंबईतल्या 947 इमारतींचा समावेश प्रस्तावित हेरिटेज वास्तूंच्या यादीत केला गेला आहे. या यादीत बीडीडी चाळींचाही समावेश करण्यात आलाय. त्यामुळे अगोदरच पुनर्वसनाअभावी त्रस्त असलेल्या बीडीडीतले रहिवासी धास्तावले आहे.

शिवडीच्या बीडीडी चाळीत राहणारे दिनेश राऊळ...गेली काही वर्ष बीडीडी पुनर्वसनाच्या प्रश्नावर अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून ते पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अगोदरच शासन दरबारी टोलवाटोलवी सुरू असताना आता वरळीतल्या बीडीडी चाळींचा समावेश प्रस्तावित हेरिटेजच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता बीडीडी पुनर्विकास रखडणार की काय अशी धास्ती त्यांना वाटतेय.

आमच्या आमदारांना आमची विनंती आहे की या प्रश्नावर तुम्ही रस्त्यावर उतरा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशी मागणी बीडीडी चाळ रहिवासी दिनेश राऊळ करत आहे.

मुंबईत वरळी, नायगाव, डिलाईल रोड आणि शिवडी या भागात मिळून एकूण 207 बीडीडी चाळी आहेत. 1921 ते 1925 च्या दरम्यान बांधलेल्या इमारती आता शंभर वर्ष जुन्या होऊन धोकादायक बनल्यात. सध्या फक्त वरळीतल्या बीडीडी चाळींचा समावेश जरी हेरिटेजच्या यादीत झाला असला तरी, त्यामुळे इतर ठिकाणच्या बीडीडींचाही पुनर्विकास रखडेल अशी भीती लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.

एकीकडे झोपडीधारकांना एसआरएच्या माध्यमातून घरं मिळत असताना, गेली 60 वर्ष इमानेइतबारे भाडं भरणार्‍या या रहिवाशांना आपल्याला घर कधी मिळणार हा प्रश्न सतावतोय. आणि आता या हेरिटेज यादीमुळे तर घराचं स्वप्न धुसर होताना दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close