S M L

भारत-पाक व्हिसा करारावर स्वाक्षरी

08 सप्टेंबरभारत आणि पाकिस्तान यांच्यात बर्‍याच काळापासून लक्ष लागून असलेला ऐतिहासिक व्हिसा करार अखेर आज करण्यात आला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी या करारावर स्वाक्षरी केली. नवीन करारांतर्गत व्हिसाची 8 भागांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यात राजनैतिक, बिगर राजनैतिक, 36 तासांचा ट्रांजिट व्हिज, पर्यटन व्हिसा, सीव्हिल सोसायटी, मीडिया आणि व्यापारी व्हिसा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हिसा असतील. पूर्वी तीन ठिकाणांसाठी मिळणारा टूरिस्ट व्हिजा आता पाच ठिकाणांसाठी करण्यात आला आहे. हा सहा महिन्यांसाठी असला तरी त्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देता येईल. नवीन व्हिसा नियमांतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि 12 वर्षांखालील मुलांना पोलिसांना माहिती द्यावी लागणार नाही. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा हे तीन दिवसांच्या इस्लामाबाद दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्याशीही चर्चा केली. या बैठकीत 26/11 चा अतिरेकी हल्ला, जम्मू-काश्मीरचा मुद्दा आणि व्यापारी संबंधांवरही चर्चा झाली. पाकिस्तानात शिक्षा पूर्ण केलेल्या भारतीय मच्छिमारांचीही लवकरच सुटका करण्याचं आश्वासन पाकिस्ताननं दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2012 03:15 PM IST

भारत-पाक व्हिसा करारावर स्वाक्षरी

08 सप्टेंबर

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बर्‍याच काळापासून लक्ष लागून असलेला ऐतिहासिक व्हिसा करार अखेर आज करण्यात आला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी या करारावर स्वाक्षरी केली. नवीन करारांतर्गत व्हिसाची 8 भागांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यात राजनैतिक, बिगर राजनैतिक, 36 तासांचा ट्रांजिट व्हिज, पर्यटन व्हिसा, सीव्हिल सोसायटी, मीडिया आणि व्यापारी व्हिसा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हिसा असतील. पूर्वी तीन ठिकाणांसाठी मिळणारा टूरिस्ट व्हिजा आता पाच ठिकाणांसाठी करण्यात आला आहे. हा सहा महिन्यांसाठी असला तरी त्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देता येईल. नवीन व्हिसा नियमांतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि 12 वर्षांखालील मुलांना पोलिसांना माहिती द्यावी लागणार नाही. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा हे तीन दिवसांच्या इस्लामाबाद दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्याशीही चर्चा केली. या बैठकीत 26/11 चा अतिरेकी हल्ला, जम्मू-काश्मीरचा मुद्दा आणि व्यापारी संबंधांवरही चर्चा झाली. पाकिस्तानात शिक्षा पूर्ण केलेल्या भारतीय मच्छिमारांचीही लवकरच सुटका करण्याचं आश्वासन पाकिस्ताननं दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2012 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close