S M L

सोलापूर अपघातात 10 ठार

30 नोव्हेंबर, सोलापूरसिद्धार्थ गोदामसोलापूर-पुणे हायवेवर झालेल्या अपघातात 10 जण ठार झाले आहेत. क्वालीस गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला आहे. हा अपघात सोलापूर-पुणे महार्गावर असलेल्या कोंडे या गावी झाला. या अपघतात 3 वर्षांची लहान मुलगी वाचली आहे.गाडी सोलापूरहून पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघाली होती. गाडीत एक लहान मुलगी आणि इतर 10 भाविक होते. हे सगळे क्वालिस गाडीतून तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुण्याकडे परतत होते. त्यावेळी कोंडे गावानजिकच्या झाडावर भाविकांची गाडी आदळली. अपघातात तीन वर्षांची छोटी मुलगी चमत्कारिकरित्या वाचली आहे. त्या छोट्या मुलीला थोडंसं खरचटलं आहे. हा अपघात पहाटे 5 - 6 च्या सुमारास झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर सकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरून गाडी घसरली असावी आणि गाडीला अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2008 09:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close