S M L

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाचा दिलासा

10 सप्टेंबरमनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी खुलताबाद कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळला आहे.आमदारानेच आम्हाला मारहाण केली असा दावा पोलीसांनी कोर्टात केला होता. पण पोलिसांचा हा दावा कोर्टाने फेटाळल्याने हा पोलिसांना कोर्टाने दिलेला हा धक्का मानला जात आहे. जानेवारी 2011 मध्ये पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. औरंगाबाद मधलं राजकारणही या मारहाणीच्या घटनेनं ढवळून निघालं होतं. जानेवारी 2011 मध्ये मुख्यमंत्री औरंगाबाद दौर्‍यावर होते. या दौर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरुळ लेणी पाहण्यासाठी खुलदाबादकडे निघाले असताना हर्षवर्धन जाधव यांनी आपली गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावेळी पोलिसांत आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. पर्यायाने पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 09:43 AM IST

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाचा दिलासा

10 सप्टेंबर

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी खुलताबाद कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळला आहे.आमदारानेच आम्हाला मारहाण केली असा दावा पोलीसांनी कोर्टात केला होता. पण पोलिसांचा हा दावा कोर्टाने फेटाळल्याने हा पोलिसांना कोर्टाने दिलेला हा धक्का मानला जात आहे. जानेवारी 2011 मध्ये पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. औरंगाबाद मधलं राजकारणही या मारहाणीच्या घटनेनं ढवळून निघालं होतं. जानेवारी 2011 मध्ये मुख्यमंत्री औरंगाबाद दौर्‍यावर होते. या दौर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरुळ लेणी पाहण्यासाठी खुलदाबादकडे निघाले असताना हर्षवर्धन जाधव यांनी आपली गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावेळी पोलिसांत आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. पर्यायाने पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close