S M L

यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार

07 सप्टेंबरयंदाचा उसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यंदा दुष्काळाचा आणि पाणीटंचाईचा फटका बसला. उसाचा वापर मोठ्या प्रमाणात चार्‍यासाठी झाला. तसेच पाणीटंचाईमुळे उसाच्या शेतीवर विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे उसाचं अडीच लाख हेक्टर क्षेत्र वाया गेलंय. 2012 -13 च्या हंगामात केवळ 62 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होणार आहे. म्हणजेच साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्राकडे विशेष शुगर पॅकेजची मागणी करणार असल्याचे सुतोवाच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 03:13 PM IST

यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार

07 सप्टेंबर

यंदाचा उसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यंदा दुष्काळाचा आणि पाणीटंचाईचा फटका बसला. उसाचा वापर मोठ्या प्रमाणात चार्‍यासाठी झाला. तसेच पाणीटंचाईमुळे उसाच्या शेतीवर विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे उसाचं अडीच लाख हेक्टर क्षेत्र वाया गेलंय. 2012 -13 च्या हंगामात केवळ 62 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होणार आहे. म्हणजेच साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्राकडे विशेष शुगर पॅकेजची मागणी करणार असल्याचे सुतोवाच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close