S M L

महिला काँस्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी एपीआय शेखला अटक

10 सप्टेंबरऔरंगाबादमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या एका महिला काँस्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.एन.शेखला अटक करण्यात आली आहे. शेखवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून संध्या मोरे या कॉन्स्टेबल महिलेनं आत्महत्या केली होती. संध्या मोरे गेल्या तीन वर्षांपासून करमाड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. रविवारी संध्या मोरे यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांनी सकाळी आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस स्टेशनचे एपीआय वाय.एन. शेख यांचं नाव घेतलंय. शेख यांच्याविरोधात लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केली होती. पण शेखला फक्त समज देण्यात आली होती. घटनेच्या दिवशी संध्या पोलीस स्टेशनमध्ये कामावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्या घरी गेल्या आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 01:15 PM IST

महिला काँस्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी एपीआय शेखला अटक

10 सप्टेंबर

औरंगाबादमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या एका महिला काँस्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.एन.शेखला अटक करण्यात आली आहे. शेखवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून संध्या मोरे या कॉन्स्टेबल महिलेनं आत्महत्या केली होती. संध्या मोरे गेल्या तीन वर्षांपासून करमाड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. रविवारी संध्या मोरे यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांनी सकाळी आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस स्टेशनचे एपीआय वाय.एन. शेख यांचं नाव घेतलंय. शेख यांच्याविरोधात लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केली होती. पण शेखला फक्त समज देण्यात आली होती. घटनेच्या दिवशी संध्या पोलीस स्टेशनमध्ये कामावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्या घरी गेल्या आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close