S M L

कुडनकुलम प्रकल्पाच्या ठिकाणी तणाव कायम

11 सप्टेंबरतामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी आजही तणाव कायम आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात निदर्शनं सुरूच आहेत. हजारो निदर्शकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी रात्रभर आंदोलन केलं. मच्छिमारांच्या हिंसक आंदोलनामुळे राज्यभरात तणाव आहे. हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आला असताना विरोधही टोकाला पोहोचला आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे विरोधक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात सोमवारी एकाचा बळी गेला. आंदोलक हिंसक झाल्यामुळे त्यांनी एका घराला आग लावली. मग आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे कुडनकुलम गाव आणि तुतिकोरिन - नागरकोईल हायवेवर काल दिवसभर तणाव होता. आंदोलक हजारोंच्या संख्येने रात्रभर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेर तळ ठोकून होते.या प्रकल्पाच्या रिऍक्टरमध्ये युरेनियम भरण्याची प्रक्रिया होतेय आणि त्यामुळे विरोधाचा हा आगडोंब उसळलाय. मद्रास हायकोर्टाने अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यामुळे आंदोलकांनी करो या मरो चा निर्धार केलाय. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हे लोक प्रकल्पाच्या ठिकाणी साखळी उपोषणही करत आहे.कुडनकुलम प्रकल्पामध्ये 1000 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या विजेची तूट भरू निघू शकते. पण आण्विक तंत्रज्ञानाबद्दलची भीती, रेडिएशनचा धोका आणि आणि त्सुनामीची शक्यता यामुळे या प्रकल्पाला विरोध होतोय. प्रकल्पाला विरोध करणार्‍या अणुविरोधी लॉबीला बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री जयललितांनी आंदोलकांना केलंय. पण तामिळनाडूतले मच्छिमार मागे हटायला तयार नाहीत. कुडनकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा हा वादंग आता अगदी टोकाला पोहोचला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 01:09 PM IST

कुडनकुलम प्रकल्पाच्या ठिकाणी तणाव कायम

11 सप्टेंबर

तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी आजही तणाव कायम आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात निदर्शनं सुरूच आहेत. हजारो निदर्शकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी रात्रभर आंदोलन केलं. मच्छिमारांच्या हिंसक आंदोलनामुळे राज्यभरात तणाव आहे. हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आला असताना विरोधही टोकाला पोहोचला आहे.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे विरोधक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात सोमवारी एकाचा बळी गेला. आंदोलक हिंसक झाल्यामुळे त्यांनी एका घराला आग लावली. मग आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे कुडनकुलम गाव आणि तुतिकोरिन - नागरकोईल हायवेवर काल दिवसभर तणाव होता. आंदोलक हजारोंच्या संख्येने रात्रभर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेर तळ ठोकून होते.

या प्रकल्पाच्या रिऍक्टरमध्ये युरेनियम भरण्याची प्रक्रिया होतेय आणि त्यामुळे विरोधाचा हा आगडोंब उसळलाय. मद्रास हायकोर्टाने अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यामुळे आंदोलकांनी करो या मरो चा निर्धार केलाय. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हे लोक प्रकल्पाच्या ठिकाणी साखळी उपोषणही करत आहे.

कुडनकुलम प्रकल्पामध्ये 1000 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या विजेची तूट भरू निघू शकते. पण आण्विक तंत्रज्ञानाबद्दलची भीती, रेडिएशनचा धोका आणि आणि त्सुनामीची शक्यता यामुळे या प्रकल्पाला विरोध होतोय. प्रकल्पाला विरोध करणार्‍या अणुविरोधी लॉबीला बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री जयललितांनी आंदोलकांना केलंय. पण तामिळनाडूतले मच्छिमार मागे हटायला तयार नाहीत. कुडनकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा हा वादंग आता अगदी टोकाला पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close