S M L

अँडी मरेनं पटकावले युएस ओपनचं जेतेपद

11 सप्टेंबरब्रिटनच्या अँडी मरेनं इतिहास रचला आहे. युएस ओपनचं जेतेपद पटकावत मरेनं आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम टायटलची नोंद केली आहे. फायनलमध्ये मरेनं वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. 1936 नंतर ब्रिटनच्या एकाही टेनिसपटूला ग्रँड स्लॅम पटकावता आलं नव्हतं, पण तब्बल 76 वर्षांनंतर अँडी मरेनं ही प्रतीक्षा संपवली. युएस ओपनची झळाळती ट्रॉफी उंचावत मरेनं इतिहास रचला. युएस ओपनची फायनल मॅच... गतविजेता चॅम्पियन नोवाक जोकोविचसमोर आव्हान होतं ते पहिलं ग्रँड स्लॅम विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचं. मॅच जबरदस्त चुरशीची होणार हे नक्की होतं. अँडी मरेसाठी मॅचची सुरुवात धक्कादायक होती. जोकोविचनने सर्व्हिस ब्रेक करत आपला इरादा स्पष्ट केला. पण वर्ल्ड नंबर दोन मरेनं पुढच्याच सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस ब्रेक केली. जोकोविचनं पुन्हा एकदा डबल फॉल्टची चुक केली आणि मरेनं सेटमध्ये 3-2 अशी आघाडी घेतली. पण जोकोविचनं सहजासहजी हार मानली नाही. दमदार कमबॅक करत त्यानं मरेला पहिल्या सेटमध्ये झुंज दिली. हा सेट टायब्रेकमध्ये गेला. लॉग रॅलीज आणि प्रत्येक पॉईंटसाठी सुरु असलेली झुंज यानं टायब्रेकची रंगत वाढली. टायब्रेकची ही लढत तब्बल 87 मिनिटं चालली आणि यात बाजी मारली ती अँडी मरेनं... हा सेट 7-6 असा जिंकत मरेनं आघाडी घेतली.जोकोविचला दुसर्‍या सेटमध्येही संघर्ष करावा लागला. मरेच्या दमदार खेळीसमोर जोकोविच काहीसा मागे पडला. दुसरा सेटही मरेनं 7-5 असा जिंकत जेतेपदाच्या दिशेनं पाऊल टाकलं.पण सहजासहजी हार मानेल तो जोकोविच कसला. गतविजेत्या जोकोविचनं आपल्या दमदार फोरहँडच्या जोरावर तिसर्‍या सेटमध्ये मरेची सर्व्हिस ब्रेक केली.. फायनलपर्यंतच्या प्रवासात जोकोविच केवळ 1 सेट हरला होता. पण फायनलमध्ये सलग दोन सेटमध्ये पराभव, हा जोकोविचसाठी मोठा धक्काच होता...पण या धक्क्यातून सावरत जोकोविचनं तिसरा सेट 6-2 असा जिंकला. यानंतर जोकोविचला थांबवणं अशक्य होतं, आपला सर्वोत्तम खेळ करत जोकोविचनं चौथ्या सेटमध्येही मरेवर मात केली.चौथा सेट जोकोविचनं 6-3 असा जिंकला आणि मॅचमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली.आता टेनिसप्रेमींचं लक्ष होतं ते पाचव्या आणि निर्णायक सेटवर..पण पाचव्या सेटमध्ये मरेचा खेळ पुन्हा बहरला. जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करत मरेनं 3-0 अशी दमदार आघाडी घेतली. जोकोविचनं कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न केला खरा, पण यात त्याला यश आलं नाही. पाचवा सेट मरेनं 6-2 असा जिंकत आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरलं. 1936 नंतर ब्रिटनला एकही टेनिसपटूला ग्रँड स्लॅम पटकावता आलं नव्हतं, पण तब्बल 76 वर्षांनंतर अँडी मरेनं ही प्रतीक्षा संपवली... युएस ओपनची झळाळती ट्रॉफी उंचावत मरेनं इतिहास रचला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 05:20 PM IST

अँडी मरेनं पटकावले युएस ओपनचं जेतेपद

11 सप्टेंबर

ब्रिटनच्या अँडी मरेनं इतिहास रचला आहे. युएस ओपनचं जेतेपद पटकावत मरेनं आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम टायटलची नोंद केली आहे. फायनलमध्ये मरेनं वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. 1936 नंतर ब्रिटनच्या एकाही टेनिसपटूला ग्रँड स्लॅम पटकावता आलं नव्हतं, पण तब्बल 76 वर्षांनंतर अँडी मरेनं ही प्रतीक्षा संपवली. युएस ओपनची झळाळती ट्रॉफी उंचावत मरेनं इतिहास रचला. युएस ओपनची फायनल मॅच... गतविजेता चॅम्पियन नोवाक जोकोविचसमोर आव्हान होतं ते पहिलं ग्रँड स्लॅम विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचं. मॅच जबरदस्त चुरशीची होणार हे नक्की होतं.

अँडी मरेसाठी मॅचची सुरुवात धक्कादायक होती. जोकोविचनने सर्व्हिस ब्रेक करत आपला इरादा स्पष्ट केला. पण वर्ल्ड नंबर दोन मरेनं पुढच्याच सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस ब्रेक केली. जोकोविचनं पुन्हा एकदा डबल फॉल्टची चुक केली आणि मरेनं सेटमध्ये 3-2 अशी आघाडी घेतली.

पण जोकोविचनं सहजासहजी हार मानली नाही. दमदार कमबॅक करत त्यानं मरेला पहिल्या सेटमध्ये झुंज दिली. हा सेट टायब्रेकमध्ये गेला. लॉग रॅलीज आणि प्रत्येक पॉईंटसाठी सुरु असलेली झुंज यानं टायब्रेकची रंगत वाढली. टायब्रेकची ही लढत तब्बल 87 मिनिटं चालली आणि यात बाजी मारली ती अँडी मरेनं... हा सेट 7-6 असा जिंकत मरेनं आघाडी घेतली.

जोकोविचला दुसर्‍या सेटमध्येही संघर्ष करावा लागला. मरेच्या दमदार खेळीसमोर जोकोविच काहीसा मागे पडला. दुसरा सेटही मरेनं 7-5 असा जिंकत जेतेपदाच्या दिशेनं पाऊल टाकलं.

पण सहजासहजी हार मानेल तो जोकोविच कसला. गतविजेत्या जोकोविचनं आपल्या दमदार फोरहँडच्या जोरावर तिसर्‍या सेटमध्ये मरेची सर्व्हिस ब्रेक केली.. फायनलपर्यंतच्या प्रवासात जोकोविच केवळ 1 सेट हरला होता. पण फायनलमध्ये सलग दोन सेटमध्ये पराभव, हा जोकोविचसाठी मोठा धक्काच होता...पण या धक्क्यातून सावरत जोकोविचनं तिसरा सेट 6-2 असा जिंकला.

यानंतर जोकोविचला थांबवणं अशक्य होतं, आपला सर्वोत्तम खेळ करत जोकोविचनं चौथ्या सेटमध्येही मरेवर मात केली.चौथा सेट जोकोविचनं 6-3 असा जिंकला आणि मॅचमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली.

आता टेनिसप्रेमींचं लक्ष होतं ते पाचव्या आणि निर्णायक सेटवर..पण पाचव्या सेटमध्ये मरेचा खेळ पुन्हा बहरला. जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करत मरेनं 3-0 अशी दमदार आघाडी घेतली. जोकोविचनं कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न केला खरा, पण यात त्याला यश आलं नाही. पाचवा सेट मरेनं 6-2 असा जिंकत आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरलं. 1936 नंतर ब्रिटनला एकही टेनिसपटूला ग्रँड स्लॅम पटकावता आलं नव्हतं, पण तब्बल 76 वर्षांनंतर अँडी मरेनं ही प्रतीक्षा संपवली... युएस ओपनची झळाळती ट्रॉफी उंचावत मरेनं इतिहास रचला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close