S M L

तक्रार केली म्हणून मेस चालकाने केली विद्यार्थ्याला मारहाण

11 सप्टेंबरऔरंगाबाद शहरातील जटवाडा इथल्या आदिवासी मुलांच्या हॉस्टेलमध्ये तक्रार केली म्हणून मेस चालकाने विद्यार्थ्याला डांबून ठेवून मारहाण केली. गजानन काळे असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. या वसतीगृहात 150 विद्यार्थी राहतात. गेल्या अनेक वर्षांंपासून या हॉस्टेलमध्ये अतिशय निकृष्ट पध्दतीचं जेवण मिळतं. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मेस चालक सय्यद हरून अली याचा काँट्रक्ट रद्द करण्यात आला. त्याचा राग मनात ठेवून सय्यदने गजाननला डांबून ठेवलं आणि मारहाण केली. या घटनेनं विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 09:54 AM IST

तक्रार केली म्हणून मेस चालकाने केली विद्यार्थ्याला मारहाण

11 सप्टेंबर

औरंगाबाद शहरातील जटवाडा इथल्या आदिवासी मुलांच्या हॉस्टेलमध्ये तक्रार केली म्हणून मेस चालकाने विद्यार्थ्याला डांबून ठेवून मारहाण केली. गजानन काळे असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. या वसतीगृहात 150 विद्यार्थी राहतात. गेल्या अनेक वर्षांंपासून या हॉस्टेलमध्ये अतिशय निकृष्ट पध्दतीचं जेवण मिळतं. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मेस चालक सय्यद हरून अली याचा काँट्रक्ट रद्द करण्यात आला. त्याचा राग मनात ठेवून सय्यदने गजाननला डांबून ठेवलं आणि मारहाण केली. या घटनेनं विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close