S M L

अबू जुंदलला 14 दिवसांची एटीएस कोठडी

11 सप्टेंबरमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू जुंदलसह बिलाल शेख आणि हिमायत बेगला एटीएसची कोठडी मिळाली. मुंबई एटीएसने या तिघांना आज नाशिकमधल्या कोर्टात हजर केलं. जुंदलला 24 सप्टेंबरपर्यंत तर बिलाल आणि बेगला 15 सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. नाशिकमधल्या पोलीस ट्रेनिंग ऍकडमी, देवळाली कॅम्प यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याप्रकरणी एटीएसने 2010 मध्ये बिलालला अटक केली होती. 26 /11 आणि जर्मन बेकरी प्रकरणातला संशयित आरोपी हिमायत बेग आणि अबू जुंदलसोबत बिलाल काम करीत असल्याचा एटीएसचा संशय आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या पुराव्यांनुसार या तिघांविरोधात नाशिकच्या सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 10:12 AM IST

अबू जुंदलला 14 दिवसांची एटीएस कोठडी

11 सप्टेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू जुंदलसह बिलाल शेख आणि हिमायत बेगला एटीएसची कोठडी मिळाली. मुंबई एटीएसने या तिघांना आज नाशिकमधल्या कोर्टात हजर केलं. जुंदलला 24 सप्टेंबरपर्यंत तर बिलाल आणि बेगला 15 सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. नाशिकमधल्या पोलीस ट्रेनिंग ऍकडमी, देवळाली कॅम्प यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याप्रकरणी एटीएसने 2010 मध्ये बिलालला अटक केली होती. 26 /11 आणि जर्मन बेकरी प्रकरणातला संशयित आरोपी हिमायत बेग आणि अबू जुंदलसोबत बिलाल काम करीत असल्याचा एटीएसचा संशय आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या पुराव्यांनुसार या तिघांविरोधात नाशिकच्या सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close