S M L

एलपीजी,डिझेल दरवाढ लांबणीवर

11 सप्टेंबरसध्यातरी घरगुती गॅस सिलेंडर आणि डिझेलची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. मागील आठवड्यात पेट्रोलच्या दरवाढीला तुर्तास ब्रेक दिल्यानंतर आज एलपीजी आणि डिझेलच्या दरवाढ होणार असल्याची पुर्वसुचना पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी दुपारी दिली होती पण राजकीय दबावापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. या दरवाढी संदर्भात मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक आज संध्याकाळी होणार होती. पण ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना 1.88 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपयांची होत असलेली घसरण यामुळे कंपन्यांना फटका बसत आहे. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 6 रुपयांचा तोटा आहे. यावर तोडगा म्हणून डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ करण्यात येणार आहे. जर उद्या ही दरवाढ झाली तर साधारणपणे डिझेल 4 रुपये तर एलपीजी 50 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 4 ते 6 सिलेंडरची मर्यादा लावणार आहे. तसेच एचपीसीएल,बीपीसीएल आणि इंडियन आईल डिझेल आणि एलपीजी सोबत पेट्रोलच्या किंमती वाढ करण्यासाठी तयारीत आहे. त्यामुळे सध्या तरी दरवाढ लांबणीवर गेली असली तर सर्वसामान्यांवर दरवाढीची तलवार कायम लटकत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 11:04 AM IST

एलपीजी,डिझेल दरवाढ लांबणीवर

11 सप्टेंबर

सध्यातरी घरगुती गॅस सिलेंडर आणि डिझेलची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. मागील आठवड्यात पेट्रोलच्या दरवाढीला तुर्तास ब्रेक दिल्यानंतर आज एलपीजी आणि डिझेलच्या दरवाढ होणार असल्याची पुर्वसुचना पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी दुपारी दिली होती पण राजकीय दबावापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. या दरवाढी संदर्भात मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक आज संध्याकाळी होणार होती. पण ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना 1.88 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपयांची होत असलेली घसरण यामुळे कंपन्यांना फटका बसत आहे. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 6 रुपयांचा तोटा आहे. यावर तोडगा म्हणून डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ करण्यात येणार आहे. जर उद्या ही दरवाढ झाली तर साधारणपणे डिझेल 4 रुपये तर एलपीजी 50 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 4 ते 6 सिलेंडरची मर्यादा लावणार आहे. तसेच एचपीसीएल,बीपीसीएल आणि इंडियन आईल डिझेल आणि एलपीजी सोबत पेट्रोलच्या किंमती वाढ करण्यासाठी तयारीत आहे. त्यामुळे सध्या तरी दरवाढ लांबणीवर गेली असली तर सर्वसामान्यांवर दरवाढीची तलवार कायम लटकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close