S M L

समाजवादी पार्टीनेही सुरू केली 2014 ची तयारी

12 सप्टेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीनेही आता 2014 च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. केंद्रात सपाच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नाही,असं मुलायमसिंग यांनी म्हटलं आहे. तसेच मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. घोटाळ्यांमुळे काँग्रेस बदनाम होतेय. काँग्रेसचं मनोबल या घोटाळ्यांमुळे तुटलं आहे असा आरोपही त्यांनी केला. सपा काँग्रेसला सध्या बाहेरून पाठिंबा देत आहे. मुलायमसिंग यांच्या आरोपामुळे पुन्हा सपा आणि काँग्रेसच्या संबंधांची चर्चा सुरू झाली आहे. मुलायमसिंग हे 2014 च्या निवडणुकींवर डोळा ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करताहेत अशी चर्चा आहे त्यापार्श्वभूमीवर या टीकेला महत्व प्राप्त झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 09:04 AM IST

समाजवादी पार्टीनेही सुरू केली 2014 ची तयारी

12 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीनेही आता 2014 च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. केंद्रात सपाच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नाही,असं मुलायमसिंग यांनी म्हटलं आहे. तसेच मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. घोटाळ्यांमुळे काँग्रेस बदनाम होतेय. काँग्रेसचं मनोबल या घोटाळ्यांमुळे तुटलं आहे असा आरोपही त्यांनी केला. सपा काँग्रेसला सध्या बाहेरून पाठिंबा देत आहे. मुलायमसिंग यांच्या आरोपामुळे पुन्हा सपा आणि काँग्रेसच्या संबंधांची चर्चा सुरू झाली आहे. मुलायमसिंग हे 2014 च्या निवडणुकींवर डोळा ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करताहेत अशी चर्चा आहे त्यापार्श्वभूमीवर या टीकेला महत्व प्राप्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close