S M L

कंदहार विमान अपहरण प्रकरणी एका अतिरेक्याला अटक

13 सप्टेंबरकंदहार विमान अपहरण प्रकरणातील एका अतिरेक्याला जम्मूमध्ये अटक करण्यात आली आहे. मेहराजउद्दीन असं त्याचं नाव आहे. तो आयएसआयचा हस्तक असल्याचा संशय आहे. पाकिस्तानकडून हव्या असलेल्या 20 महत्वाच्या अतिरेक्यांमध्ये मेहराजुद्दीनचा समावेश आहे. कंदहार विमान प्रकरणातल्या अतिरेक्यांना आर्थिक मदत पुरवण्याचं काम तो करायचा अशीही माहिती मिळतेय. गेल्या 25 वर्षातली ही सगळ्यात मोठी अटक असल्याचं जम्मूच्या पोलिसांनी म्हटलं आहे. मेहराजुद्दीनला किश्तवार जिल्ह्यातून अटक करण्यात आली. मेहराजुद्दीनचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणातला एक आरोपी अर्शद छीमा याच्याबरोबर त्यानं काम केलं होतं, अशी माहिती पुढे आली आहे. अर्शद छीमा हा काठमांडूमधला पाकिस्तानचा राजदूत होता. दरम्यान, मेहराज हा नेपाळहून त्याच्या घरी जम्मूमध्ये यायला निघाला होता त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 10:33 AM IST

कंदहार विमान अपहरण प्रकरणी एका अतिरेक्याला अटक

13 सप्टेंबर

कंदहार विमान अपहरण प्रकरणातील एका अतिरेक्याला जम्मूमध्ये अटक करण्यात आली आहे. मेहराजउद्दीन असं त्याचं नाव आहे. तो आयएसआयचा हस्तक असल्याचा संशय आहे. पाकिस्तानकडून हव्या असलेल्या 20 महत्वाच्या अतिरेक्यांमध्ये मेहराजुद्दीनचा समावेश आहे. कंदहार विमान प्रकरणातल्या अतिरेक्यांना आर्थिक मदत पुरवण्याचं काम तो करायचा अशीही माहिती मिळतेय. गेल्या 25 वर्षातली ही सगळ्यात मोठी अटक असल्याचं जम्मूच्या पोलिसांनी म्हटलं आहे. मेहराजुद्दीनला किश्तवार जिल्ह्यातून अटक करण्यात आली. मेहराजुद्दीनचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणातला एक आरोपी अर्शद छीमा याच्याबरोबर त्यानं काम केलं होतं, अशी माहिती पुढे आली आहे. अर्शद छीमा हा काठमांडूमधला पाकिस्तानचा राजदूत होता. दरम्यान, मेहराज हा नेपाळहून त्याच्या घरी जम्मूमध्ये यायला निघाला होता त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close