S M L

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

13 सप्टेंबरजळगांव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार सुरेश जैन यांचा जामीनासाठी केलेला अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे. घरकुल घोटाळा प्रकरणात जैन हे आरोपी असून त्यांच्यावर सध्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधे उपचार सुरु आहे. मुळ तक्रारीत आमदार जैन यांचं नाव नव्हतं. पण जैन हेच या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. गेल्या आठवड्याभरापासून जैन यांच्या अर्जावर युक्तीवाद सुरु होता. जैन यांच्यावर झालेल्या ब्रीच कँडी रुग्णलयात झालेल्या शस्त्रक्रीयेची कागदपत्रेही कोर्टाने मागवली होती. कोर्टाच्या या निकालामुळे जैन यांना जसलोक हॉस्पिटलमधील उपचारानंतर पुन्हा कोर्टाला शरण यावं लागणार हे निश्चीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 11:41 AM IST

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

13 सप्टेंबर

जळगांव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार सुरेश जैन यांचा जामीनासाठी केलेला अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे. घरकुल घोटाळा प्रकरणात जैन हे आरोपी असून त्यांच्यावर सध्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधे उपचार सुरु आहे. मुळ तक्रारीत आमदार जैन यांचं नाव नव्हतं. पण जैन हेच या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. गेल्या आठवड्याभरापासून जैन यांच्या अर्जावर युक्तीवाद सुरु होता. जैन यांच्यावर झालेल्या ब्रीच कँडी रुग्णलयात झालेल्या शस्त्रक्रीयेची कागदपत्रेही कोर्टाने मागवली होती. कोर्टाच्या या निकालामुळे जैन यांना जसलोक हॉस्पिटलमधील उपचारानंतर पुन्हा कोर्टाला शरण यावं लागणार हे निश्चीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close