S M L

भाकरे महाराज ट्रस्टमध्ये जमीन घोटाळा उघड

13 सप्टेंबरनागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यात असलेल्या संत भाकरे महाराज सेवा ट्रस्टमध्ये जमीन घोटाळा झाल्याचं उघड झालंय. या संस्थेला 72 एकर जमीन दान मिळाली होती. त्यापैकी काही जमीन अध्यक्ष धनराज काळे यांनी कोणाचीही परवानगी न घेता जमिनी परस्पर विकल्याचा आरोप भाकरे महाराजांच्या अनुयायांनी केला आहे. गेल्या तीस वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षांनी एकाही रूपयाचा हिशेब चॅरिटी कमिश्नरला दिला नसल्याचं ही उघड झालंय. या संस्थेच्या विदर्भात 24 शाखा आहे तसेच कोट्यावधीची संपत्ती संस्थेकडे आहे संस्थेचे अध्यक्ष धनराज काळे हे गेल्या तीस वर्षापासून संस्थेचा कारभार बघतात तसेच त्यांनी संस्थेच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय. या संबंधीची तक्रार हायकोर्टात करण्यात आली होती. यावर न्यायालयाने संस्थेचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं पण तरी ही अध्यक्ष धनराज काळे संस्थेचा ताबा सोडायला तयार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 11:57 AM IST

भाकरे महाराज ट्रस्टमध्ये जमीन घोटाळा उघड

13 सप्टेंबर

नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यात असलेल्या संत भाकरे महाराज सेवा ट्रस्टमध्ये जमीन घोटाळा झाल्याचं उघड झालंय. या संस्थेला 72 एकर जमीन दान मिळाली होती. त्यापैकी काही जमीन अध्यक्ष धनराज काळे यांनी कोणाचीही परवानगी न घेता जमिनी परस्पर विकल्याचा आरोप भाकरे महाराजांच्या अनुयायांनी केला आहे. गेल्या तीस वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षांनी एकाही रूपयाचा हिशेब चॅरिटी कमिश्नरला दिला नसल्याचं ही उघड झालंय. या संस्थेच्या विदर्भात 24 शाखा आहे तसेच कोट्यावधीची संपत्ती संस्थेकडे आहे संस्थेचे अध्यक्ष धनराज काळे हे गेल्या तीस वर्षापासून संस्थेचा कारभार बघतात तसेच त्यांनी संस्थेच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय. या संबंधीची तक्रार हायकोर्टात करण्यात आली होती. यावर न्यायालयाने संस्थेचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं पण तरी ही अध्यक्ष धनराज काळे संस्थेचा ताबा सोडायला तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close