S M L

बिहारमधून आलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

12 सप्टेंबरबिहारमधून महाराष्ट्रात आलेला मोठा शस्त्रसाठा कुर्ला रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी 8 रायफल्स, 27 बनावट लायसन्स आणि काही जिवंत काडतुसं जप्त केली आहे. या प्रकरणी भरत चंद्रमा सिंग याला ताब्यात घेतले आहे. भरत सिंग हा बिहाराच राहणार असून मंगळवारी संध्याकाळी तो शस्त्रासह कुर्ला स्टेशनवर उतरला होता. त्यानं दिलेल्या माहितीवरून मुंबईतल्या इतर ठिकाणांवरून अजून 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या सिक्युरिटी एजन्सीजना हा शस्त्र पुरवठा केला जाणार होता. मंगळवारी रात्री कुर्ला टर्मिनस येथे एक संशयित दोन रायफल घेऊन उभा होता. योवळी कुर्ला रेल्वे पोलिसांनी या संशयिताकडे विचारपूस केली असता तो योग्य ती उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला त्याला ताबडतोब ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन रायफल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. त्याची चौकशी केली असता त्यानुसार मुंबईतल्या सिक्युरीटी एजन्सींना आणि तेथील सुरक्षारक्षकांना रायफल पुरवून बनावट लायन्सस देत होता अशी माहिती या इसमानं रेल्वे पोलिसांना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 04:40 PM IST

बिहारमधून आलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

12 सप्टेंबर

बिहारमधून महाराष्ट्रात आलेला मोठा शस्त्रसाठा कुर्ला रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी 8 रायफल्स, 27 बनावट लायसन्स आणि काही जिवंत काडतुसं जप्त केली आहे. या प्रकरणी भरत चंद्रमा सिंग याला ताब्यात घेतले आहे. भरत सिंग हा बिहाराच राहणार असून मंगळवारी संध्याकाळी तो शस्त्रासह कुर्ला स्टेशनवर उतरला होता. त्यानं दिलेल्या माहितीवरून मुंबईतल्या इतर ठिकाणांवरून अजून 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या सिक्युरिटी एजन्सीजना हा शस्त्र पुरवठा केला जाणार होता. मंगळवारी रात्री कुर्ला टर्मिनस येथे एक संशयित दोन रायफल घेऊन उभा होता. योवळी कुर्ला रेल्वे पोलिसांनी या संशयिताकडे विचारपूस केली असता तो योग्य ती उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला त्याला ताबडतोब ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन रायफल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. त्याची चौकशी केली असता त्यानुसार मुंबईतल्या सिक्युरीटी एजन्सींना आणि तेथील सुरक्षारक्षकांना रायफल पुरवून बनावट लायन्सस देत होता अशी माहिती या इसमानं रेल्वे पोलिसांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close