S M L

अमेरिकेविरोधात अरब राष्ट्रात असंतोषाचा भडका

13 सप्टेंबरलिबिया आणि इजिप्तनंतर आता येमनमध्येही अमेरिकेविरोधी आंदोलन सुरू झालं आहे. अमेरिकेच्या येमेनमधल्या दूतावासावर आज हिंसक जमावाने हल्ला चढवला. अमेरिकेविरोधातलं हे आंदोलन हळूहळू हिंसक होताना दिसतंय. हे लोण संपूर्ण अरब जगतात पसरेल अशी भीतीही व्यक्त होत आहे.अरब जगत पुन्हा धगधगायला सुरुवात झाली आहे. क्रांतीची लाट ओसरते न ओसरते.. तोच तिथे पुन्हा हिंसेला सुरुवात झाली. लिबिया आणि इजिप्तनंतर आता येमेनमध्येही निदर्शनं सुरू झाली आहे. या सर्व ठिकाणी अमेरिकन दूतावासांना लक्ष्य करण्यात आलंय. येमेनची राजधानी सानामध्ये अमेरिकी दूतावासाच्या परिसरात शेकडो लोकांचा जमाव घुसला आणि त्यांनी परिसरातल्या गाड्यांची जाळपोळ केली, इमारतीची तोडफोड केली. पोलिसांनी या जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. जमावाने केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. पण महत्त्वाच्या अधिकार्‍यांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. दिवसभर सशस्त्र आंदोलक साना शहरातल्या रस्त्यांवर खुलेआम फिरताना दिसत होते. हा सर्व वाद एका डॉक्युमेंट्रीवरून उफाळला. अमेरिकेमध्ये बनवण्यात आलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी काही अवमानकारक मजकूर असल्याचं म्हटलं जातंय. हा मजकूर युट्यूबवर आल्यानंतर असंतोषाला तोंड फुटलं. येमेनच्या आधी.. लिबियामध्ये संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात अमेरिकी राजदूतासह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इजिप्तची राजधानी असलेल्या कैरो शहरातल्या अमेरिकन दूतावासावरही हल्ला झाला होता. या घटनांनंतर अमेरिकेनं जगभरातल्या आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवलीय. अमेरिकेनं खबरदारी म्हणून दोन युद्धनौकाही लिबिया आणि त्रिपोलीच्या दिशेनं रवाना केल्या आहेत. भारतानंही अशा प्रकारचे हल्ले चिंताजनक असल्याचं म्हटलंय. हे हल्ले चिंताजनक आहेत. या हल्ल्यांचा भारतानंही निषेध केला.या आंदोलनाचं लोण इतर अरब राष्ट्रांमध्ये पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली जातेय. अफगाणिस्तानमध्ये युट्यूबवर असलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर बंदी घालण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 12:50 PM IST

अमेरिकेविरोधात अरब राष्ट्रात असंतोषाचा भडका

13 सप्टेंबर

लिबिया आणि इजिप्तनंतर आता येमनमध्येही अमेरिकेविरोधी आंदोलन सुरू झालं आहे. अमेरिकेच्या येमेनमधल्या दूतावासावर आज हिंसक जमावाने हल्ला चढवला. अमेरिकेविरोधातलं हे आंदोलन हळूहळू हिंसक होताना दिसतंय. हे लोण संपूर्ण अरब जगतात पसरेल अशी भीतीही व्यक्त होत आहे.

अरब जगत पुन्हा धगधगायला सुरुवात झाली आहे. क्रांतीची लाट ओसरते न ओसरते.. तोच तिथे पुन्हा हिंसेला सुरुवात झाली. लिबिया आणि इजिप्तनंतर आता येमेनमध्येही निदर्शनं सुरू झाली आहे. या सर्व ठिकाणी अमेरिकन दूतावासांना लक्ष्य करण्यात आलंय. येमेनची राजधानी सानामध्ये अमेरिकी दूतावासाच्या परिसरात शेकडो लोकांचा जमाव घुसला आणि त्यांनी परिसरातल्या गाड्यांची जाळपोळ केली, इमारतीची तोडफोड केली. पोलिसांनी या जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. जमावाने केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. पण महत्त्वाच्या अधिकार्‍यांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. दिवसभर सशस्त्र आंदोलक साना शहरातल्या रस्त्यांवर खुलेआम फिरताना दिसत होते.

हा सर्व वाद एका डॉक्युमेंट्रीवरून उफाळला. अमेरिकेमध्ये बनवण्यात आलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी काही अवमानकारक मजकूर असल्याचं म्हटलं जातंय. हा मजकूर युट्यूबवर आल्यानंतर असंतोषाला तोंड फुटलं.

येमेनच्या आधी.. लिबियामध्ये संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात अमेरिकी राजदूतासह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इजिप्तची राजधानी असलेल्या कैरो शहरातल्या अमेरिकन दूतावासावरही हल्ला झाला होता. या घटनांनंतर अमेरिकेनं जगभरातल्या आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवलीय. अमेरिकेनं खबरदारी म्हणून दोन युद्धनौकाही लिबिया आणि त्रिपोलीच्या दिशेनं रवाना केल्या आहेत. भारतानंही अशा प्रकारचे हल्ले चिंताजनक असल्याचं म्हटलंय. हे हल्ले चिंताजनक आहेत. या हल्ल्यांचा भारतानंही निषेध केला.या आंदोलनाचं लोण इतर अरब राष्ट्रांमध्ये पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली जातेय. अफगाणिस्तानमध्ये युट्यूबवर असलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर बंदी घालण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close