S M L

ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका

12 सप्टेंबरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठे यांना आज अटक करून लगेच सुटका करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज त्यांना अटक करून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याची तक्रार ह मो मराठे यांच्याविरोधात करण्यात आली होती. मराठे यांनी एका पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला. सोमवारी मराठे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत जेम्स लेनच्या पात्राचा उल्लेख मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मराठे यांची दिलगिरी पुरेशी नाही असं संभाजी ब्रिगेडने स्पष्ट करत विरोध कायम ठेवला. आज ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका झाल्यामुळे साहित्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 01:41 PM IST

ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका

12 सप्टेंबर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठे यांना आज अटक करून लगेच सुटका करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज त्यांना अटक करून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याची तक्रार ह मो मराठे यांच्याविरोधात करण्यात आली होती. मराठे यांनी एका पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला. सोमवारी मराठे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत जेम्स लेनच्या पात्राचा उल्लेख मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मराठे यांची दिलगिरी पुरेशी नाही असं संभाजी ब्रिगेडने स्पष्ट करत विरोध कायम ठेवला. आज ह.मो.मराठेंना अटक आणि सुटका झाल्यामुळे साहित्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close