S M L

युवराज सिंगचं दमदार कमबॅक

12 सप्टेंबरतो आला, तो खेळला आणि त्यानं जिंकलं...कॅन्सरवर मात करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराजनं दमदार कमबॅक केलंय. भारतीय टीम मॅच हरली पण युवराजनं क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. ज्या जिद्दीनं त्यानं कॅन्सरवर मात केली, त्याच जिद्दीनं युवराजनं मैदानही गाजवलं. ज्या क्षणाची सर्व जण आतुरतेनं वाट पहात होते ते तो क्षण अखेर सत्यात उतरला. भारतीय क्रिकेटचा युवराज अखेर मैदानात उतरला. त्यानं बॉलिंग केली. एक कॅच घेतला. टाळ्यांच्या कडकडातात बॅटिंगसाठी आला. 2 खणखणीत सिक्स ठोकले. शेवटच्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड झाला. पण आऊट होण्याचं कोणालाही वाईट वाटलं नाही कारण युवीसाठी हा खरच एक ड्रीम कमबॅक होता. कोणी फारशी अपेक्षा केली नव्हती, पण युवीनं आपल्या आगमनाची दखल घ्यायला भाग पाडलंय. त्याच्या बॅटिंगमध्ये जुना आत्मविश्वास झळाळत होता. दोन खणखणीत सिक्स आणि 1 तुफान फोर मारत त्यानं आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. बॅटिंगबरोबरचं बॉलिंगमध्येही युवीनं आपली छाप उमटवली. त्यानं टाकलेल्या दोन ओव्हरमध्ये विकेट जरी घेतली नसली तरी रन्स मात्र रोखले. जेम्स फ्रँकलिनचा कॅच घेत तर त्यानं जुन्या आठवणींना उजाळा दिला. खडतर दिवस आता त्यानं मागे टाकलेत. युवराज सिंगनं यशस्वी रित्या कमबॅक केलंय. ऑलराऊंड कामगिरी करत त्यानं स्वता:ला सिद्ध केलंय. पुढचे काही दिवस युवीसाठी महत्वाचे ठरणार आहेत. पण युवी या सगळ्या आव्हानांसाठी सज्ज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 02:37 PM IST

युवराज सिंगचं दमदार कमबॅक

12 सप्टेंबर

तो आला, तो खेळला आणि त्यानं जिंकलं...कॅन्सरवर मात करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराजनं दमदार कमबॅक केलंय. भारतीय टीम मॅच हरली पण युवराजनं क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. ज्या जिद्दीनं त्यानं कॅन्सरवर मात केली, त्याच जिद्दीनं युवराजनं मैदानही गाजवलं.

ज्या क्षणाची सर्व जण आतुरतेनं वाट पहात होते ते तो क्षण अखेर सत्यात उतरला. भारतीय क्रिकेटचा युवराज अखेर मैदानात उतरला. त्यानं बॉलिंग केली. एक कॅच घेतला. टाळ्यांच्या कडकडातात बॅटिंगसाठी आला. 2 खणखणीत सिक्स ठोकले. शेवटच्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड झाला. पण आऊट होण्याचं कोणालाही वाईट वाटलं नाही कारण युवीसाठी हा खरच एक ड्रीम कमबॅक होता.

कोणी फारशी अपेक्षा केली नव्हती, पण युवीनं आपल्या आगमनाची दखल घ्यायला भाग पाडलंय. त्याच्या बॅटिंगमध्ये जुना आत्मविश्वास झळाळत होता. दोन खणखणीत सिक्स आणि 1 तुफान फोर मारत त्यानं आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. बॅटिंगबरोबरचं बॉलिंगमध्येही युवीनं आपली छाप उमटवली. त्यानं टाकलेल्या दोन ओव्हरमध्ये विकेट जरी घेतली नसली तरी रन्स मात्र रोखले. जेम्स फ्रँकलिनचा कॅच घेत तर त्यानं जुन्या आठवणींना उजाळा दिला.

खडतर दिवस आता त्यानं मागे टाकलेत. युवराज सिंगनं यशस्वी रित्या कमबॅक केलंय. ऑलराऊंड कामगिरी करत त्यानं स्वता:ला सिद्ध केलंय. पुढचे काही दिवस युवीसाठी महत्वाचे ठरणार आहेत. पण युवी या सगळ्या आव्हानांसाठी सज्ज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close