S M L

डिझेल 5 रुपयांनी महागलं; वर्षाकाठी 6 सिलेंडरच मिळणार

13 सप्टेंबरदरवाढ लांबणीवर गेलेल्या बातमीने सुखावलेल्या सर्वसामान्यांना अखेर सरकारने धक्का दिला आहे. डिझेलच्या दरात घसघसशीत 5 रुपयांची वाढ करण्यात असून आज मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. तसेच केरोसीन,एलपीजीची दरवाढ झाली नसली तरी एलपीजी सिलेंडरवर सरकारने मर्यादा घातल्या आहे. यापुढे सबसिडीत वर्षभरात फक्त सहा सिलेंडरच मिळणार आहे असा धक्कादायक निर्णय केंद्रीय पेट्रोलियम खात्याने घेतला आहे. त्यामुळे महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेल्या सामान्यांना झटका बसला आहे. दोनच दिवसांपुर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दरवाढ लांबणीवर ढकली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता पण दरवाढीची धाकधूक होतीच अखेर दरवाढीचा भडका झाला आणि सर्वसामान्यांच्या किचनला एकच हादरा बसला आहे. यापुढे वर्षभरात सबसिडीतत्वावर सहा सिलेंडरच मिळणार आहे. आणि जर तुम्ही सातवे सिलेंडर घेतले तर बाजारभावाप्रमाणे किंमत मोजावी लागणार आहे. गेल्या दीडवर्षापासून डिझेलच्या किमंतीत दरवाढ झाली नसल्याचं कारण देत 5 रुपयांने वाढ करण्यात आली आहे. सध्या चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना 1.88 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपयांची होत असलेली घसरण यामुळे कंपन्यांना फटका बसत आहे. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 6 रुपयांचा तोटा आहे. यावर तोडगा म्हणून डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचं ठरलं होतं. एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्याची शक्यता होती पण दरवाढीपेक्षा सरकारने मर्यादा घातल्या आहे. पेट्रोल आणि केरोसिनच्या दरात मात्र कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. भाजपसह आणि डाव्यांसह यूपीएचा मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसने दरवाढीवर टीका केली आहे. दरवाढ करताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याशी चर्चा केली नव्हती असं तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनजीर्ंनी म्हटलंय. सरकारनं ही दरवाढ मागे घ्यावी, असं ममतांनी म्हटलंय. अशी असेल दरवाढशहर जुने दर नवे दर मुंबई46.25 रु. 51.25 रु. पुणे 46.25 रु. 51.25 रु.नागपूर45.80 रु. 50.80 रु.नाशिक 46.65 रु.50.80 रु.जळगाव 46.95 रु.51.65 रु.रत्नागिरी46.50 रु. 51.50 रु.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 02:50 PM IST

डिझेल 5 रुपयांनी महागलं; वर्षाकाठी 6 सिलेंडरच मिळणार

13 सप्टेंबर

दरवाढ लांबणीवर गेलेल्या बातमीने सुखावलेल्या सर्वसामान्यांना अखेर सरकारने धक्का दिला आहे. डिझेलच्या दरात घसघसशीत 5 रुपयांची वाढ करण्यात असून आज मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. तसेच केरोसीन,एलपीजीची दरवाढ झाली नसली तरी एलपीजी सिलेंडरवर सरकारने मर्यादा घातल्या आहे. यापुढे सबसिडीत वर्षभरात फक्त सहा सिलेंडरच मिळणार आहे असा धक्कादायक निर्णय केंद्रीय पेट्रोलियम खात्याने घेतला आहे. त्यामुळे महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेल्या सामान्यांना झटका बसला आहे.

दोनच दिवसांपुर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दरवाढ लांबणीवर ढकली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता पण दरवाढीची धाकधूक होतीच अखेर दरवाढीचा भडका झाला आणि सर्वसामान्यांच्या किचनला एकच हादरा बसला आहे. यापुढे वर्षभरात सबसिडीतत्वावर सहा सिलेंडरच मिळणार आहे. आणि जर तुम्ही सातवे सिलेंडर घेतले तर बाजारभावाप्रमाणे किंमत मोजावी लागणार आहे. गेल्या दीडवर्षापासून डिझेलच्या किमंतीत दरवाढ झाली नसल्याचं कारण देत 5 रुपयांने वाढ करण्यात आली आहे. सध्या चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना 1.88 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात रुपयांची होत असलेली घसरण यामुळे कंपन्यांना फटका बसत आहे. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 6 रुपयांचा तोटा आहे. यावर तोडगा म्हणून डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचं ठरलं होतं. एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्याची शक्यता होती पण दरवाढीपेक्षा सरकारने मर्यादा घातल्या आहे. पेट्रोल आणि केरोसिनच्या दरात मात्र कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. भाजपसह आणि डाव्यांसह यूपीएचा मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसने दरवाढीवर टीका केली आहे. दरवाढ करताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याशी चर्चा केली नव्हती असं तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनजीर्ंनी म्हटलंय. सरकारनं ही दरवाढ मागे घ्यावी, असं ममतांनी म्हटलंय.

अशी असेल दरवाढ

शहर जुने दर नवे दर मुंबई46.25 रु. 51.25 रु. पुणे 46.25 रु. 51.25 रु.नागपूर45.80 रु. 50.80 रु.नाशिक 46.65 रु.50.80 रु.जळगाव 46.95 रु.51.65 रु.रत्नागिरी46.50 रु. 51.50 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close