S M L

सरकारकडून भुजबळांची पाठराखण, गृहखाते अडले चौकशीवर

13 सप्टेंबरदिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी राज्य सरकारच छगन भुजबळ यांची पाठराखण करतंय असं आता पुढे येतंय. या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे केली. अँटी करप्शन ब्युरोने ही विनंती गृहखात्याकडे पाठवली. पण अजूनपर्यंत ही परवानगी मिळू शकत नाही असं पत्र लिहून राज्य सरकारच्या गृहखात्याने कळवलं आहे. किरीट सोमय्यांनी भुजबळांविरोधातले सगळे कागदपत्रं सादर केलेत. भुजबळांनी नातेवाइकांनाच कंत्राटं दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मी चौकशीला तयार आहे आणि किरीट सोमय्यांचे आरोप तथ्यहीन आहेत, असा दावा भुजबळांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 04:20 PM IST

सरकारकडून भुजबळांची पाठराखण, गृहखाते अडले चौकशीवर

13 सप्टेंबर

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी राज्य सरकारच छगन भुजबळ यांची पाठराखण करतंय असं आता पुढे येतंय. या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे केली. अँटी करप्शन ब्युरोने ही विनंती गृहखात्याकडे पाठवली. पण अजूनपर्यंत ही परवानगी मिळू शकत नाही असं पत्र लिहून राज्य सरकारच्या गृहखात्याने कळवलं आहे. किरीट सोमय्यांनी भुजबळांविरोधातले सगळे कागदपत्रं सादर केलेत. भुजबळांनी नातेवाइकांनाच कंत्राटं दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मी चौकशीला तयार आहे आणि किरीट सोमय्यांचे आरोप तथ्यहीन आहेत, असा दावा भुजबळांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close