S M L

पुजा जाधव खून प्रकरण एकाला अटक

12 सप्टेंबरपुण्यात एआरडीई परिसरात राहणार्‍या पूजा जाधव या अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी आज आकाश कोळी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचनं दिली. पूजा पाषाणमधल्या इंग्रजी शाळेत दहावीत शिकत होती. शनिवारी ती ट्यूशनसाठी घराबाहेर पडली. पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या वडिलांनी शोधाशोध केली आणि अखेर चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण रविवारी दुपारी घरापासून जवळच तिचा मृतदेह सापडला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 01:33 PM IST

पुजा जाधव खून प्रकरण एकाला अटक

12 सप्टेंबर

पुण्यात एआरडीई परिसरात राहणार्‍या पूजा जाधव या अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी आज आकाश कोळी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचनं दिली. पूजा पाषाणमधल्या इंग्रजी शाळेत दहावीत शिकत होती. शनिवारी ती ट्यूशनसाठी घराबाहेर पडली. पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या वडिलांनी शोधाशोध केली आणि अखेर चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण रविवारी दुपारी घरापासून जवळच तिचा मृतदेह सापडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close