S M L

यूपीए संकटात ;विरोधकांची भारत बंदची हाक

15 सप्टेंबरगेल्या तीन दिवसात डिझेल दरवाढ आणि गॅस सिलेंडवर मर्यादा आणि एफडीआय ला दिलेल्या परवानगीमुळे सरकारवर विरोधकांनी एकच हल्लाबोल केला आहे. आपण घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकार संकटात सापडलंय. केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही विरोध केला आहे. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर दुसरीकडे एनडीएने पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे. आज कोलकातामध्ये दरवाढी आणि एफडीआयच्या विरोधात एक विराट मोर्चा निघाला. सरकारच्या विरोधातला मोर्चा विरोधकांनी काढला नाही. हा काढलाय.. यूपीएचाच घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसने.. गॅस आणि डिझेलची दरवाढ मंगळवारपर्यंत मागे घेतली नाही. तर आपण कठोर निर्णय घेऊ, असं ममतांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं. ममतांकडे 19 जागा आहेत. त्यांनी पाठिंबा काढला तर यूपीए सरकार अडचणीत येऊ शकतं. सपा आणि बसपानेही बाहेरून दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. पण मनमोहन सिंग यांनी मात्र यावेळी माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारचं अस्तित्व पणाला लागलंय.सरकारसमोरच्या अडचणी येणार्‍या दिवसांत वाढतच जाणार आहेत. कारण 20 सप्टेंबरच्या दिवशी भाजपने भारत बंदची हाक दिली. मुदतपूर्व निडवणुका घेण्याचं आव्हानही भाजपने दिलंय. 2008 साली अणुकराराच्या मुद्द्यावरून.. बंगालमधल्याच डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढला होता. आता बंगालमधल्या पंचायत निवडणुकांवर डोळा ठेवून ममता दीदी त्याची पुनरावृत्ती करतील का हे मंगळवारी होणार्‍या पक्षाच्या बैठकीत ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 04:48 PM IST

यूपीए संकटात ;विरोधकांची भारत बंदची हाक

15 सप्टेंबर

गेल्या तीन दिवसात डिझेल दरवाढ आणि गॅस सिलेंडवर मर्यादा आणि एफडीआय ला दिलेल्या परवानगीमुळे सरकारवर विरोधकांनी एकच हल्लाबोल केला आहे. आपण घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकार संकटात सापडलंय. केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही विरोध केला आहे. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर दुसरीकडे एनडीएने पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे.

आज कोलकातामध्ये दरवाढी आणि एफडीआयच्या विरोधात एक विराट मोर्चा निघाला. सरकारच्या विरोधातला मोर्चा विरोधकांनी काढला नाही. हा काढलाय.. यूपीएचाच घटक असलेल्या तृणमूल काँग्रेसने.. गॅस आणि डिझेलची दरवाढ मंगळवारपर्यंत मागे घेतली नाही. तर आपण कठोर निर्णय घेऊ, असं ममतांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं.

ममतांकडे 19 जागा आहेत. त्यांनी पाठिंबा काढला तर यूपीए सरकार अडचणीत येऊ शकतं. सपा आणि बसपानेही बाहेरून दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. पण मनमोहन सिंग यांनी मात्र यावेळी माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारचं अस्तित्व पणाला लागलंय.

सरकारसमोरच्या अडचणी येणार्‍या दिवसांत वाढतच जाणार आहेत. कारण 20 सप्टेंबरच्या दिवशी भाजपने भारत बंदची हाक दिली. मुदतपूर्व निडवणुका घेण्याचं आव्हानही भाजपने दिलंय.

2008 साली अणुकराराच्या मुद्द्यावरून.. बंगालमधल्याच डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढला होता. आता बंगालमधल्या पंचायत निवडणुकांवर डोळा ठेवून ममता दीदी त्याची पुनरावृत्ती करतील का हे मंगळवारी होणार्‍या पक्षाच्या बैठकीत ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close