S M L

डेक्कन चार्जर्स नव्या मालकाच्या शोधात

13 सप्टेंबरआयपीएलमधल्या डेक्कन चार्जर्स टीम नव्या मालकाच्या शोधात आहे. आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आधीचे मालक डेक्कन क्रोनीकलकडून फ्रँचाईजी काढून घेण्यात आली आहे आणि यानंतर बीसीसीआयनं टीमसाठी टेंडर काढलं. पण केवळ एकच टेंडर बीसीसीआयकडे आलं आहे. आंध्रप्रदेश स्थित पीव्हीपी फिल्म्स डेक्कन चार्जर्स टीम विकत घेण्यासाठी उत्सुक होती. यासाठी त्यांनी 855 ते 915 कोटी रुपायांचं टेंडर दिलं. पण त्यांचं हे टेंडर रद्द करण्यात आलं. याआधी बँकांनी टीमसाठी जे लोन दिलंय ते अजूनही वसूल झालेलं नाही. या कारणावरुनच पीव्हीपीचं टेंडर रद्द करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 04:41 PM IST

डेक्कन चार्जर्स नव्या मालकाच्या शोधात

13 सप्टेंबर

आयपीएलमधल्या डेक्कन चार्जर्स टीम नव्या मालकाच्या शोधात आहे. आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आधीचे मालक डेक्कन क्रोनीकलकडून फ्रँचाईजी काढून घेण्यात आली आहे आणि यानंतर बीसीसीआयनं टीमसाठी टेंडर काढलं. पण केवळ एकच टेंडर बीसीसीआयकडे आलं आहे. आंध्रप्रदेश स्थित पीव्हीपी फिल्म्स डेक्कन चार्जर्स टीम विकत घेण्यासाठी उत्सुक होती. यासाठी त्यांनी 855 ते 915 कोटी रुपायांचं टेंडर दिलं. पण त्यांचं हे टेंडर रद्द करण्यात आलं. याआधी बँकांनी टीमसाठी जे लोन दिलंय ते अजूनही वसूल झालेलं नाही. या कारणावरुनच पीव्हीपीचं टेंडर रद्द करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 04:41 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close